बापरे...सोमवारी कोल्हापूर ओसंडून वाहिले...
दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर व पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीने कोल्हापूर सोमवारी गर्दीने अक्षरक्ष: ओसंडून वाहिले. भाजी मंडई, पेट्रोल पंपापासून ते शहरातील प्रमुख रस्त्यांवर लोकांचे लोटच्या लोट वाहत होते. त्यातील अनेकांच्या तोंडाला मास्क जरूर होते. परंतु कुठेही सामाजिक अंतर पाळले जात नव्हेत त्यामुळे ही गर्दी पाहून कसा रोखणार कोरोना संसर्ग असाच प्रश्न उपस्थित झाला. कोल्हापुरातील फूल मार्केट अशी ओळख असलेल्या मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती (नसीर अत्तार)
१२०४२०२१-कोल-गर्दी व गर्दी०२
कोल्हापुरातील मध्यवर्ती महाद्वार रोडवरही खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. (नसीर अत्तार)
१२०४२०२१-कोल-गर्दी०३ व ०४
कोल्हापुरातील कपिलतीर्थ भाजी मंडईत सोमवारी सकाळीच पिशव्या हातात घेऊन खरेदीसाठी धावलेल्या लोकांची अशी तुडुंब गर्दी उसळली होती. (नसीर अत्तार)
१२०४२०२१-कोल-गर्दी०५
कोल्हापुरातील दसरा चौकातील कॅनरा बँकेच्या दारात सकाळी अकरा वाजताच अशी गर्दी झाली होती.
१२०४२०२१-कोल-गर्दी०६
पापाची तिकटी ते महापालिका चौक मार्गावरही मोटारसायकलसह वाहनांचीही लांबच्या लांब रांगच लागली होती (नसीर अत्तार)
१२०४२०२१-कोल-गर्दी०७
लक्ष्मीपुरीतील मुख्य बाजारपेठेत धान्य व इतर जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते.
१२०४२०२१-कोल-गर्दी०८
कोल्हापुरात इंधनाचा साठा पुरेसा असतानाही पेट्रोल पंपावर मात्र सोमवारी अशी रांग लागली होती. (नसीर अत्तार)