शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कोल्हापूर : दादू चौगुले - ध्यानचंद, राही, स्मृती यांना अर्जुन पुरस्कार---दादू चौगुले, राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:41 PM

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘ध्यानचंद पुरस्कार’ रुस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना तर सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत व क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देदादू चौगुले, राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाटवयाच्या सातव्या वर्षी कोल्हापूरातील मोतीबाग तालीम मध्ये गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखलक्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच क्रीडारसिकांमध्ये आनंदाची लाट

कोल्हापूर : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘ध्यानचंद पुरस्कार’ रुस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना तर सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत व क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा गुरुवारी करण्यात आली. २०१८ यावर्षीसाठीचे विविध क्रीडा पुरस्कार ३७ खेळाडू आणि प्रशिक्षकांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये खेलरत्न दोन, द्रोणाचार्य आठजणांना, अर्जुन वीसजणांना, ध्यानचंद चारजणांना आणि तिघांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येतील. राष्ट्रपती भवनात २५ सप्टेंबरला होणाºया विशेष समारंभात सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येईल.

साडेसात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र, तर आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाºया विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषक, १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

दादू चौगुले, राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाटकोल्हापूर : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत, डबल महाराष्टÑ केसरी दादू चौगुले व स्मृती मानधना यांना क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याचे झाल्याचे समजताच करवीरनगरीतील क्रीडारसिकांमध्ये आनंदाची लाट पसरली.

मूळचे अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील दादू चौगुले हे कुस्तीनिमित्त वयाच्या सातव्या वर्षी कोल्हापुरातील मोतीबाग तालीममध्ये दाखल झाले. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. न्यूझीलंड येथे १९७४ मध्ये ख्राईस्टचर्च येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली. दादू चौगुले यांनी १९७० मध्ये पुणे येथे व १९७१ साली आलिबाग येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला.

दादू चौगुले यांनी ३ मार्च १९७३ ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर ३ एप्रिल १९७३ ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला. १६ एप्रिल १९७८ ला कोल्हापुरात झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सादिक पंजाबी या उत्तरेतील मल्लाला त्यांनी अस्मान दाखविले. २९ डिसेंबर १९७६ ला बेळगाव (कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. १९७४ साली राज्य शासनाने त्यांना ‘शिवछत्रपती पुरस्कारा’ने सन्मानित केले.

 

कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारी राही नेमबाजीमधील २५ मीटर ०.२२ स्पोर्टस पिस्तल प्रकारातील आघाडीची नेमबाज आहे. तिने २००८ साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर तिने २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. २०११ साली आशियाई स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याच काळात ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. यानंतर चॅगवॉन येथे आयएफएस विश्व नेमबाजी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकाविले. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, तर इचिआॅनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कांस्यपदक पटकावले.

२२ आॅगस्ट २०१८ ला जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत राहीने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. राहीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण १०० हून अधिक पदके जिंकली आहेत. तिच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय रायफल असोसिएशनने तिची ‘अर्जुन पुरस्कारा’साठी शिफारस केली होती.मुंबईत जन्मलेल्या स्मृती मानधनाचे बालपण सांगलीत गेले. वयाच्या ९ व्या वर्षीच महाराष्टÑाच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघात तिची निवड झाली. वयाच्या ११ व्या वर्षी तिची महाराष्टच्या १९ वर्षांखालील संघात वर्णी लागली होती. १९ वर्षांखालील संघातून खेळताना तिने गुजरातविरुद्ध नाबाद २२४ धावांची खेळी केली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. १० एप्रिल २०१३ ला तिने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. स्मृतीने ४४ एकदिवसीय सामन्यात १६०० धावा केल्या आहेत. प्रसंगी आॅफ ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या स्मृतीने भारतीय संघात सलामीची फलंदाज म्हणून आपला ठसा उमटविला आहे.कोल्हापूरची ‘राही’ पाचवी अर्जुनवीरराही सरनोबत ही कोल्हापूरची पाचवी ‘अर्जुन पुरस्कार’ विजेती खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९६३ मध्ये हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना, १९७६ साली टेबलटेनिसपटू शैलजा साळोखे, २०११ साली नेमबाज तेजस्विनी सावंत व गोल्डन बॉय वीरधवल खाडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नेमबाजीमध्ये यापूर्वी २००० मध्ये महाराष्ट्राच्या अंजली वेदपाठक-भागवत, २००४ मध्ये दीपाली देशपांडे यांनाही ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे. 

दादू चौगुले महाराष्ट्राचे तिसरे कुस्तीपटूदादू चौगुले यांच्याबरोबरच सत्यदेव प्रसाद, भारतकुमार क्षेत्री, बॉबी अलॉयसुस यांनाही यंदाचा ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी या पुरस्काराने महाराष्ट्रातील सांगलीचे पैलवान मारुती माने यांना २००५ मध्ये तर लातूरचे पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांना २००६ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.

सुवर्णकन्या राही सरनोबत हिला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळी कोल्हापुरात तिच्या घरातील सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.महान भारत केसरी दादू चौगुले यांना ‘ध्यानचंद’ पुरस्कार जाहीर केला. ही बातमी समजताच त्यांचे चिरंजीव हिंदकेसरी विनोद चौगुले, अमोल चौगुले, आदींनी एकच जल्लोष केला.क्रिकेटपटू स्मृती मानधनाला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर सांगलीतील तिच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. डावीकडून तिची भावजय प्रियांका, आई स्मिता, वडील श्रीनिवास आणि भाऊ श्रवण उपस्थित होते. 

राहीला क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाल्याने माझ्या कुटुंबासह मला अत्यानंद होत आहे. याहीपेक्षा आणखी चांगली कामगिरी करून तिने देशाचा झेंडा डौलाने फडकावीत ठेवावा, इतकीच अपेक्षा.-  जीवन सरनोबत, राहीचे वडील.

बाबांच्या कुस्तीतील योगदानाबद्दल यापूर्वीच पुरस्कार मिळायला हवा होता; मात्र वेळाने का असेना, त्यांच्या कुस्तीतील योगदानाची दखल केंद्राने घेतली, ही बाब मोठी आहे.- विनोद चौगुले, हिंदकेसरी.

कोल्हापूरच्या क्रीडानगरीला आतापर्यंत राहीच्या रूपाने पाचवा ‘अर्जुन पुरस्कार’ मिळाला आहे. ही श्रृंखला यापुढे या नगरीतील क्रीडापटूंनी अशीच सुरू ठेवावी.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर.

मी, हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांची प्रेरणा घेतल्यानंतर १९७६ मध्ये मला हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तेजस्विनी, वीरू आणि आता ‘राही’च्या रूपाने ही परंपरा पुढे सुरू राहिली आहे, ही बाब निश्चितच करवीरच्या क्रीडानगरीसाठी मानाची आहे. यापुढेही या नगरीतील खेळाडू ही परंपरा कायम राखतील.- शैलजा साळोखे,  अर्जुन पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतkolhapurकोल्हापूरVirat Kohliविराट कोहली