कोल्हापूर : गेली सात दिवस मृत्यूशी झुंझ देणाऱ्या इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सुनील शामराव पाटील (वय ४२, रा. जवाहरनगर चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.
प्रेमप्रकरणाच्या त्रिकोणातून त्यांनी विष प्राशन केले होते. अधिक माहिती अशी, सुनील पाटील हे इचलकरंजी-शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस नाईक पदावर कार्यरत असून हजेरी मास्तरची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २४ सप्टेंबरला दुपारी ते शास्त्रीनगर येथील बुद्धगार्डनमध्ये बेशुद्धावस्थेत नागरिकांना मिळून आले होते. शास्त्रीनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या त्रासाला की कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, याची चौकशी राजारामपुरी पोलीस करीत आहेत. ते यापूर्वी लक्ष्मीपुरी, गांधीनगर पोलीस ठाण्यात काम करीत होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून नोकरीवर असताना तेथील दोन महिला कॉन्स्टेबलशी त्यांची मैत्री झाली. त्यातून त्यांचे दोघीसोबत प्रेमसंबध जुळले. त्या दोघींकडून त्यांना वारंवार ब्लॅकमेल केले जात होते, अशी पोलीस दलात चर्चा आहे.
सुनिल पाटील यांचे वडील पोलीस दलात होते. त्यांच्या निधनानंतर ते अनुकंपाखाली पोलीस दलात भरती झाले. सुमारे चौदा वर्ष त्यांची सेवा झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.अंत्यंस्कारसुनिल पाटील यांचा मुलगा अकरावीचे शिक्षण घेतो. वडीलांच्यामुळे या कुटूंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांनी या प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याने कुटूंबाकडे दूर्लक्ष केले होते. त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हती. अखेर नातेवाईकांनी समजूत घालून त्याला अंतसंस्कार पूर्ण करण्यास लावले.
दोन्ही महिला कॉन्स्टेल त्याच्या घरी व पोलीस ठाण्यात येवून सुनील पाटील यांना धमक्या देत होत्या. तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन तुझे आयुष्य रस्त्यावर आणीन अशा धमक्या वारंवार दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पोलीस दलात आहे.