शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्यांनी पाडले कांदा सौदे बंद, व्यापाऱ्यांना विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 7:03 PM

दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले.

ठळक मुद्दे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी पाडले कांदा सौदे बंदव्यापाऱ्यांना विचारला जाब१६ रुपये दर झाल्याने कांदा उत्पादक आक्रमक

कोल्हापूर : दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी सौदे बंद पाडले. व्यापाऱ्यांना तब्बल तासभर धारेवर धरल्याने बाजार समितीमधील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. समिती प्रशासनाने चर्चा केल्यानंतर पुन्हा सौदे पूर्ववत झाले.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी १२ हजार पिशव्यांची आवक होते. बुधवारी तब्बल १५ हजार ४७९ पिशव्यांची आवक झाल्याने दरात थोडी घसरण झाली. गेले चार दिवस चांगल्या कांद्याला २३ ते २४ रुपये किलो दर राहिला; पण बुधवारी चांगल्या कांद्याचा दर २० रुपयांपर्यंतच थांबल्याने शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले.

 

 त्यानंतर शेतकऱ्यांनी समिती कार्यालयाकडे मोर्चा वळवत प्रशासनास जाब विचारला. समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक नंदकुमार वळंजू, बाबूराव खोत, सचिव मोहन सालपे, उपसचिव राजेंद्र मंडलिक यांनी व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली.

यामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडत असल्याचा आरोप केला. सोमवार, मंगळवारी २५ रुपये किलो असणारा कांदा एकदम १७ रुपयांवर कसा आला? अशी विचारणा करीत ‘दर सुधारले नाहीत तर सौदे सुरू होऊ देणार नाही,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

शेतकरी आमचे दैवत आहेत. तुम्ही आलात तरच आमची दुकाने सुरू राहतील, असे व्यापारी अशोककुमार आहुजा यांनी सांगितले. पुण्यासह इतर बाजारपेठांतील आजचे दर पहा, सगळीकडेच दर घसरल्याने येथे कोणीही दर पाडत नसल्याचे आहुजा यांनी सांगितले. २० रुपयांच्या खाली सौद्यात दर येणार नाही, याची खात्री द्या; मगच सौदे सुरू करा, यावर शेतकरी ठाम राहिले.

सौद्यात तुम्हाला अपेक्षित दर मिळाला नाही तर विक्री करू नका, तुमचा कांदा व्यापाऱ्यांच्या गोदामात सुरक्षित राहील. त्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही. शेतकऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय समिती करील, असे सभापती कृष्णात पाटील, नंदकुमार वळंजू व मोहन सालपे यांनी सांगितले. त्याला व्यापाऱ्यांनीही सहमती दर्शविल्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.

बंदनंतर तोच दर!दरातील घसरणीचा निषेध करीत शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. समितीने हस्तक्षेप केल्यानंतर सौदे सुरू झाले; पण दरात फारसा फरक पडला नाही.

 

व्यापाऱ्यांनी लूट सुरू केली असून, सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. आवक वाढली तरी एका दिवसात किलोमागे आठ रुपयांची घसरण होते कशी? किमान २५ रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.- संपत शिरसाट,शेतकरी, श्रीगोंदा 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीonionकांदा