शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापनाची पंचगंगा नदीत प्रात्यक्षिके, सदैव सज्ज रहा : महापौर, आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:16 PM

कोल्हापूर शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली.

कोल्हापूर : शहर परिसरात कोणतीही आपत्ती ओढवली की तत्परतेने लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिके करून दाखविली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नैसर्गिक संकट निर्माण झाले तर त्याच्याशी सामना करण्यासाठी अग्निशमन दल अद्ययावत उपकरणांसह सजग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. ही प्रात्यक्षिके पाहून महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी जवानांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडे असलेल्या उपकरणांचा उपयोग आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याची नदीघाटावर पंचगंगा प्रात्यक्षिके करून दाखविताना स्थानक अधिकारी मनीष रणभिसे.प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांतर्फे पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करून आपण कोणत्याही संकटाचा मुकाबला करू शकतो, हे दाखवून दिले जाते. 

पंचगंगा नदीघाटावर अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, रेस्क्यू व्हॅनसह जवान नदीकाठावर पोहोचले. पाठोपाठ महापौर बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरीदेखील दाखल झाले. नदीकाठावर नैसर्गिक आपत्तीच्या काळात लागणाºया उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या सर्व उपकरणांची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली.एखाद्या घराचा स्लॅब कोसळला असेल आणि त्याखाली लोक सापडले असतील तर त्यांची तत्काळ सोडवणूक करण्याकरिता वापरले जाणारे हायड्रॉलिक जॅक, वेगवेगळ्या प्रकारचे कटर, स्पे्रडर यांचीही प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. त्यानंतर नदीत बुडणाऱ्या व्यक्तींंना कशा प्रकारे वाचविले जाते, हेही दाखविण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून पंचगंगा नदीत आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्याची पाहणी केली.महापौर, आयुक्तांनी नदीत मोटरबोटमधून फेरफटकाही मारला. यावेळी प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, जयवंत खोत, ओंकार खेडकर, रवींद्र ठोंबरे यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असणारी उपकरणेजनरेटर - ३रेस्क्यू बेल्ट - १२बी. ए. सेट - ११एस्टिंग्युशर - ३२हेल्मेट - ३२पोर्टेबल पंप - ५फायर सूट - ८लाईफ जॅकेट - ६०सेफ्टी नेट -६टर्बो नोझल - ६लिफ्टिंग बॅग - १हायड्रॉलिक स्पेडर, कटर, जॅकसॉ कटर्स - ७लाईफ बॉय - १५स्लॅब कटर - २मॅन्युअल आॅपरेटेड स्प्रेडर व कटररेस्क्यू बोट - ३फ्लोटिंग पंप - ३बॅटरी - ४मेगा फोन - ४

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाriverनदीkolhapurकोल्हापूर