कोल्हापूर : शहरात रस्त्याकडेला बसून व्यवसाय करणाऱ्यांना बायोमेट्रिक कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याने रिपब्लिकन फेरीवाला सेना यांच्या अंतर्गत भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बायोमेट्रिक कार्ड द्यावेत, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेतर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात यावेत, म्हणून रिपब्लिकन सेनेतर्फे २० जानेवारी २०१६ व २६ जानेवारी २०१६ रोजी अर्ज केले होते. त्यानंतरही प्रशासनास स्मरणपत्रे पाठविली होती; परंतु अद्याप महानगरपालिकेने या अर्जांची दखल घेतलेली नाही. प्रशासन बायोमेट्रिक कार्ड टाळत असल्यामुळे महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.निदर्शनास जितेंद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, रमेश कामत, भीमराव कांबळे, लक्ष्मी चौगुले, निलम वाणी, शारदा मजगे, सुभद्रा खांडेकर, लक्ष्मीबाई वासुदेव, वत्सला माने, लक्ष्मी बागडी यांनी भाग घेतला.