शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

कोल्हापूर : चार दिवसांत डेंग्यूच्या ३४ रुग्णांची भर, डासांचा प्रभाव आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:18 PM

डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देचार दिवसांत डेंग्यूच्या ३४ रुग्णांची भरआजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम

कोल्हापूर : डेंग्यूचे डास शहरवासीयांची पाठ काही सोडता सोडायला तयार नाहीत. जुने रुग्ण बरे होतात न होतात तोच नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या चार दिवसांत शहरात डेंग्यूचे ३४ नवीन, तर १५ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने या आजाराचा आणि डासांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.कोल्हापूर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट झाला आहे. स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या आणि दिवसा नागरिकांना चावणाऱ्या या डासांचा बीमोड करणे महापालिकेच्या आरोग्य विभागासह शहरवासीयांना अशक्य झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम, औषध फवारणीसहा जनजागृतीचे काम हाती घेतले.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची अकरा पथके रोज विशिष्ट भागांत जाऊन घरांचे सर्वेक्षण करतात. नागरिकांना डेंग्यूचा डासांचा बीमोड करण्यासाठी कशा प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे, याची माहिती देतात. प्रत्येक घरात जाऊन जेथे डेंग्यूच्या अळ्या, अंडी आढळतात, तेथे औषध फवारणी केली जाते.परंतु सगळे प्रयत्न करूनही डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती व त्यांचा डंख काही कमी झालेला नाही. जुने रुग्ण बरे होत असताना तेवढीच रुग्णसंख्या नव्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांसह नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे.महापालिकेच्या पथकांकडून गुरुवारी भोसले पार्क, सदर बाजार, कनाननगर, नागाळा पार्क, राजेंद्रनगर, नेहरूनगर, सुभाषनगर, सोमवार पेठ, रमणमळा, आदी परिसरांतील ४६७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाण्याचे ८०० कंटेनर तपासले गेले. त्यांपैकी १७ घरांत डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.

दोन बांधकाम साईट तपासण्यात आल्या. तेथे दूषित पाणीसाठे असल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयात १५ डेंग्यूसदृश रुग्ण मिळून आले; तर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील लॅबमध्ये गेल्या चार दिवसांत तपासणीला आलेल्या रुग्णांपैकी ३४ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

 

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूर