शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

कोल्हापूर : महापालिका आयुक्तांच्या दारात दिवाळीदिवशी फटाके फोडू : देवदत्त माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:27 PM

दिव्यांगांचा निधी महापालिका आयुक्तांनी टक्केवारीसाठी के.एम.टी. व लिफ्टसाठी वळविल्याचा निषेध करीत, हा निधी पूर्ववत दिव्यांगांना द्यावा; अन्यथा ६ नोव्हेंबरला दिवाळीदिवशी आयुक्तांच्या दारात फटाके फोडून आंदोलन करू, असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी  येथे दिला.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांच्या दारात दिवाळीदिवशी फटाके फोडू : देवदत्त माने प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या बैठकीत इशारा : दिव्यांगांचा निधी अन्यत्र वळविल्याचा निषेध

कोल्हापूर : दिव्यांगांचा निधी महापालिका आयुक्तांनी टक्केवारीसाठी के.एम.टी. व लिफ्टसाठी वळविल्याचा निषेध करीत, हा निधी पूर्ववत दिव्यांगांना द्यावा; अन्यथा ६ नोव्हेंबरला दिवाळीदिवशी आयुक्तांच्या दारात फटाके फोडून आंदोलन करू, असा इशारा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी  येथे दिला.टाउन हॉल येथील विरंगुळा केंद्र येथे आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.देवदत्त माने म्हणाले, दिव्यांगांसाठी राखीव असणारा अपंग कल्याण निधी महापालिका आयुक्तांनी मनमानी पद्धतीने के.एम.टी. व शिवाजी मार्केट येथील लिफ्टसाठी वळविला आहे. दरवर्षी जवळपास चार कोेटी निधी मंजूर होतो; परंतु गेल्या चार वर्षांपासून या निधीतील पैसे दिव्यांगांसाठीच खर्च झालेले नाहीत. त्यांच्या हक्काचा हा निधी त्यांना न विचारता परस्पर अन्यत्र वळविल्याबद्दल आयुक्तांचा निषेध आहे.

अशा पद्धतीने निधी इतरत्र वळविणे हा शासनाच्या निर्णयाप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबरला दिवाळीदिवशी आयुक्तांच्या घरासमोर फटाके फोडून आंदोलन केले जाईल. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष विकास चौगुले, विष्णुपंत पाटील, अक्षय म्हेत्तर यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर