कोल्हापूर - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातातकोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण (वय ५१ रा. मूळ सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीमधील दोन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे (3 मार्च) हा अपघात झाला.
रणवीर चव्हाण आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दोघे अधिकारी सोमवारी रात्री खासगी गाडीने मुंबईला निघाले होते. साखर कारखान्याच्या कर्जाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आज त्यांची मंत्रालयात बैठक होती. त्यासाठीचे प्रस्ताव घेऊन ते निघाले होते. त्यांच्या कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली. रणवीर चव्हाण हे अतिशय चांगले अधिकारी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने बँक कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण
फिनिश नितीश अन् फिर से नितीश, बिहारमध्ये कोणती मोहीम यशस्वी ठरणार?
‘निर्भया’च्या चारही खुन्यांची आजची फाशीही टळली
मुंबईतून ३,९१,१९१ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, आजपासून परीक्षेला सुरुवात