शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

कोल्हापूर जिल्हा बँक आता जाणार व्यापारी, उद्योजकांच्या दारात, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 2:25 PM

ग्राहकांना क्यूआर कोड स्टँडीसह साउंड बॉक्स सुविधा देण्याची मोहीम

कोल्हापूर : जिल्हा बँक छोटे, मोठे दुकानदार, व्यापारी, उद्योजकांच्या दारात जाणार असून बँकेच्या वतीने क्यूआर कोड स्टँडीसह साऊंड बॉक्स सुविधा पुरवण्याची मोहीम हातात घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. येत्या दोन महिन्यात एक लाख ग्राहकांपर्यंत क्यूआर कोड पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून ग्राहकांना बँकेच्या वतीने विमा सुविधा देण्याचा बँकेचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ग्राहकांना अत्याधुनिक सुविधांमुळे वेळ व प्रवासाची बचत होऊन घरबसल्या सुविधा मिळणार आहेत. या योजनेचा प्रचार व प्रसार कोल्हापूर शहरासह तालुकास्तरावर करण्यात येणार आहे. तालुक्याची गावे, मोठ्या बाजारपेठा, मोठी गावे व इतर ठिकाणचे व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांकडे जाण्यासाठी बँकेने ही मोहीम हाती घेतली आहे. कामाच्या व्यापातून त्यांना रोज बँकेत येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी क्यूआर कोडसह साउंड बॉक्स सुविधा पुरविण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष आमदार राजू आवळे यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित हाेते.

विनाशुल्क जोडणी.!ग्राहकांना ही सुविधा विनाशुल्क जोडणावळ करून दिली जाणार आहे. क्यूआर कोडच्या व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकाला बँकेकडे त्याच्या इच्छेनुसार दैनंदिन संचयनी म्हणजेच पिग्मी खात्यामध्ये इच्छेनुसार रक्कम ठेवता येणार आहे. पिग्मीवर ग्राहकांना अत्यल्प व्याजदराचे कर्जही दिले जाणार आहे.‘पी. एन.’ यांची खुर्ची रिकामी राहील.!दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी गेली ४० वर्षे बँकेचे संचालक म्हणून उत्कृष्ट काम केले. सभागृहातील ईशान्येकडील कोपऱ्यातील खुर्चीत बसून ते शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच हिरीरीने मांडायचे. आज ती खुर्ची रिकामीच पडल्याचे सांगताना मंत्री मुश्रीफ भावुक झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ