शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

kdcc bank result : मुश्रीफ-सतेज पाटील-कोरे आघाडीचीच पुन्हा सत्ता, शिवसेनेची मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 9:54 AM

बँकेवरील सत्ता कायम राखण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे हे यशस्वी झाले.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीची सरशी झाली. बँकेवरील सत्ता कायम राखण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे हे यशस्वी झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीस १७, तर विरोधी शिवसेना आघाडीस ४ जागा मिळाल्या.शिवसेनेनेही जोरदार मुसंडी मारली असून, चार जागा जिंकल्या आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचा पतसंस्था गटातून धक्कादायक पराभव झाला. भाजपचा एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाला आहे. या निवडणुकीत भाजप सत्तारूढ आघाडीत, तर विरोधात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनल होते. मंडलिक प्रक्रिया गटातून विजयी झाले.

बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांचे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होते. शिवसेनेने तीन जागा मागितल्या होत्या. त्यांना दोन जागा देण्याची मुश्रीफ यांची तयारी होती. आमदार कोरे यांनी राजकीय विरोधक असलेल्या बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना पॅनलमध्ये घ्यायचे नाही, असा आग्रह धरला. त्यातून वाटाघाटी फिसकटल्या व मंडलिक यांनी बाहेर पडून परिवर्तन पॅनल निर्माण केला.मंडलिक यांना सत्तापरिवर्तन करता आले नाही, परंतु त्यांनी चांगली लढत दिली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेेचे उमेदवार अर्जुन आबीटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा पतसंस्था गटातून मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी खासदार निवेदिता माने, काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांचे बंधू अर्जुन आबीटकर हे प्रमुख उमेदवार विजयी झाले. मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.यड्रावकर यांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना रिंगणात उतरवले होते; परंतु तिथे पाटील यांचा पराभव झाला. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ शेट्टी यांच्या गटाचा हा तिसरा पराभव आहे.या निवडणुकीत २१ जागांपैकी विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्याने १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. एकूण ७६५१ मतदार होते. ५ तारखेला चुरशीने ९८ टक्के मतदान झाले होते.

सात नव्या चेहऱ्यांना संधी

या निवडणुकीत अर्जुन आबीटकर, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, रणवीर गायकवाड, सुधीर देसाई, अमल महाडिक, विजयसिंह माने या नव्या चेहऱ्यांना बँकेच्या सत्तेत प्रथमच संधी मिळाली. त्यातील रणवीर गायकवाड हे काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचे नातू आहेत.श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, सुधीर देसाई व विजयसिंह माने यांच्या रूपाने कार्यकर्त्यांना संधी मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार यांचा मात्र पराभव झाला.

सात आमदार..एक खासदार

जिल्हा बँक म्हणजे जिल्ह्याच्या राजकीय व आर्थिक सत्तेची नाडी समजली जाते. त्यामुळे या बँकेची सत्ता आपल्याकडेच राहिली पाहिजे यासाठी मातब्बर नेत्यांनी ताकद पणाला लावली. संचालक मंडळात मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर या मंत्र्यांसह आमदार सर्वश्री पी. एन. पाटील, विनय कोरे, राजेश पाटील आणि राजूबाबा आवळे यांचा समावेश आहे. खासदार संजय मंडलिक यांच्यासह माजी खासदार निवेदिता माने यादेखील निवडून आल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकResult Dayपरिणाम दिवस