शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

गोकुळ'कडून दूध उत्‍पादकांना गुढी पाडव्‍याची भेट, दूध खरेदी दरात केली 'इतकी' दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:33 PM

संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध खरेदी दरामध्‍ये १ एप्रिल पासुन ही दरवाढ करण्यात येणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या दरवाढीची अंमलबजावणी उद्या, शुक्रवार पासून करण्यात येणार असून उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याची भेट दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ साठीचा दर ४१ रुपये ५० पैशावरुन ४३ रुपये ५० पैसे तर गाय दूध दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. साठी २७ रुपयांवरुन २९ रुपयांपर्यंत दर दूध उत्पादकांना मिळणार आहे.गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांच्या सहकाऱ्यामुळेच संघाने घोडदौड सुरू ठेवल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.दहा महिन्यात दुसरी दरवाढ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर गेल्या दहा महिन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा खरेदी दरात वाढ केली आहे. पहिल्यांदा म्हैस दूध खरेदी दरात दोन तर गाय दुधास एक रुपये वाढ केली होती. आता पुन्हा म्हैस व गाय दुधास प्रत्येकी दोन रुपयांची अशी गेल्या दहा महिन्यात अनुक्रमे चार व तीन रुपयांची वाढ केली.विक्री दरवाढ तूर्त लांबणीवरसाधारणत: दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर विक्री दरातही वाढ केली जाते. राज्यातील इतर दूध संघांनी खरेदी व विक्री दरात वाढ केली, मात्र ‘गोकुळ’ ने सध्या केवळ खरेदी दरातच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळFarmerशेतकरी