शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

कोल्हापूर जिल्ह्यातील ४९७ शाळांचे ‘डाएट’कडून सर्वेक्षण

By संदीप आडनाईक | Published: March 27, 2023 2:00 PM

संदीप आडनाईक कोल्हापूर : शालेय पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन दरवर्षी बाह्य मूल्यांकनाचा उपक्रम राबवत असते. याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा ...

संदीप आडनाईककोल्हापूर : शालेय पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन दरवर्षी बाह्य मूल्यांकनाचा उपक्रम राबवत असते. याअंतर्गत कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डाएट) जिल्ह्यातील ‘अ’ दर्जाच्या ४९७ शाळांचे शुक्रवारी सर्वेक्षण केले. यात १२ तालुक्यांतील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीचे ११,५१२ विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वेक्षणावर जिल्हा, राज्य आणि देशाच्या शालेय शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून आहे.डाएटने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण झाले. शाळांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक संपादणूक या आधारावर कोल्हापूर जिल्ह्यातील या शाळांची पडताळणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. शाळा मानके आणि शालेय मूल्यांकन प्रतिसाद, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन गाभा मानके, विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास, कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, शाळा विकास व्यवस्थापन समितीचे आयोजन व व्यवस्थापन, उत्पादक समाजाचा सहभाग या घटकांवर या शाळांचे हे सर्वेक्षण झाले. त्यातील निष्कर्षांच्या आधारे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर घालण्यासाठी काही उपक्रम शिक्षण विभाग राबवणार आहे.या सर्वेक्षणासाठी ४९७ क्षेत्रीय अन्वेषक, १३ तालुका समन्वयक यांच्यासह प्रा. वैशाली पाटील आणि सरिता कुदळे या जिल्हा समन्वयकांच्या मदतीने शाळांचे सर्वेक्षण पार पडले. याच्या तयारीसाठी आठवडाआधी दोन बैठका तसेच विद्यार्थी निवड आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. या मूल्यांकनाचे निष्कर्ष महिन्याभरात जाहीर होतील. -आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर.

सहभागी तालुके, शाळा, आणि विद्यार्थी

तालुका - इयत्ता तिसरी (मुले) - पाचवी (मुले)  - आठवी (मुले) - एकूण शाळा (एकूण मुले)करवीर : - २४(४९७)   - २३(४८४)   - २० (५९०) -  ६७ (१५७१)शाहूवाडी : - ११ (१९९)  - ९(१८०)   - १५ (३७१)  -  ३५ (३७१)राधानगरी : - ७(१६८)   - ११(२१२)  - १३ (३१२)  - ३१(६९२)हातकणंगले : - २२(४७५) -  २२(५५३) -  २७ (७७६) -  ७१(१८०४)गगनबावडा : - १(१६)   -२(४१)  -  ५ (११२)  -  ८(१६९)पन्हाळा : - १८ (३८७) -  १९(४९६)  - १० (२९९)  -  ४७ (११८२)आजरा : - ६(९७)  - ५(८३) - ५ (१३३)  -  १६ (३१३)शिरोळ : -१३(३१८) -१४(३०३) -१२ (३४६) -३९ (९६७)कागल : -११(२६९) -२२(४७१) -१५ (३६८)  -  ४८(११०८)गडहिंग्लज :- ११(२००) -७(१२६) -१४ (३२६) - ३२ (६५२)भुदरगड : -९(१५०) -८(१५२) -११(२९५)  -२८ (५९७)चंदगड : -१६(३१४) -९(१७४) -१५ (३६९) -४०(८५७)कोल्हापूर महापालिका : -१०(२६६) -१२(२५५) -१३ (३२९) -३५ (८५०)एकूण : -१५९(३३५६) -१६३(३५३०) -१७५ (४६२६)     -४९७(११,५१२)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा