शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

विधानसभेचे पडघम; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून ईव्हीएम मशीनची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 1:40 PM

जिल्ह्यासाठी १८ हजारांवर मशीन दाखल : इच्छुकांच्याही जोरबैठका सुरू

कोल्हापूर : जिल्हा निवडणूक विभागाच्या पातळीवर आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारपासून ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी सुरू होणार आहे. जिल्ह्यासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, असे १८ हजार ११८ मशीन दाखल झाले आहेत. शासकीय गोडावून येथे ४० दिवस मशीनची तपासणी सुरू राहील.आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे. त्याच्या राजकीय घडामोडीही सुरू झाल्या आहेत. पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी ज्या उड्या पडल्या, त्यामागेही विधानसभेचेच कारण आहे. मेळावा, सभा, बैठका घेऊन त्यासाठीच्या जोरबैठका इच्छुक मारू लागले आहेत. त्यातच आता निवडणुकीची तयारी प्रशासनाकडूनही सुरू झाली आहे. विधानसभेसाठी जिल्ह्यात बेल कंपनीचे १८ हजारांवर मशीन दाखल झाले आहेत. या मशीनची प्राथमिकस्तरीय तपासणी शासकीय गोडावून येथे गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी बेल कंपनीचे ६ अभियंते कोल्हापुरात आले आहेत. नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांची व सहायक पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार जयंत गुरव व शिवाजी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह ३० हमाल कर्मचारी व १० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गुरुवारपासून पुढील ४० दिवसांत ही प्राथमिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे हे नियोजन करत आहेत.

अंतिम मतदार यादी २७ तारखेला प्रसिद्ध होणारनिवडणूक आयोगाने पूर्वी दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध होणार होती; मात्र आता त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. नव्या कार्यक्रमानुसार शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. १६ तारखेपर्यंत त्यावरील हरकती स्वीकारल्या जातील. २३ तारखेपर्यंत हरकती निकाली काढल्या जातील आणि २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

जिल्ह्यासाठी दाखल मशीनबॅलेट युनिट : ८ हजार ४४१कंट्रोल युनिट : ४ हजार ९४९व्हीव्हीपॅट : ४ हजार ७२८एकूण : १८ हजार ११८

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाEVM Machineईव्हीएम मशीन