शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

‘गोकुळ’ उभारणार पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नालॉजी कॉलेज; महाराष्ट्रातील पहिले खासगी महाविद्यालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:55 AM

शेतकऱ्यांच्या मुलांना पशुवैद्यकीय अधिकारी होण्याची संधी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नालाॅजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालय हाेणार आहेत. त्याचा फायदा कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मुलांना होणार आहे. जिल्हा परिषद व ‘गोकुळ’कडे सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शंभरहून अधिक जागा रिक्त आहेत.कोल्हापूर जिल्ह्याने दूध व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. जिल्ह्याचे पशुधन १० लाख ७९ हजार ५५६ इतके आहे. पण, त्या पटीत पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने ‘एलएसएस’ कडून स्थानिक पातळीवर उपचार करुन घ्यावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ९५ जागा मंजूर आहेत, त्यापैकी ६०हून अधिक जागा रिक्त आहेत. गेली दहा-पंधरा वर्षे पूर्णक्षमतेने जागा भरल्या गेल्या नाहीत. जागा भरल्या तर तात्पुरते काम करुन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दुसरे क्षेत्र निवडले जाते. ‘गोकुळ’मध्ये चांगला पगार असतानाही तिथे जवळपास वीस जागा रिक्त आहेत.

सध्या महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय पाच ठिकाणी तर देशात खासगी व शासकीय महाविद्यालयाची संख्या केवळ ५६ आहे. यापूर्वी महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाने परवानगी दिली जात नसल्याने ही संख्या मर्यादित राहिली. मात्र, आता शासनाने परवानगी दिल्याने ‘गोकुळ’ने प्रस्ताव तयार केला असून, सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन शासनाकडे पाठवला जाणार आहे.

कात्यायनी येथे ६० क्षमतेचे महाविद्यालयपशुवैद्यकीय व डेअरी टेक्नालॉजी महाविद्यालय हे ‘गोकुळ’च्या कात्यायनी येथील जागेवर करण्याबाबत विचार सुरू आहे. दोन्ही महाविद्यालयांची ६०-६० प्रवेशक्षमता राहणार आहे.

महाराष्ट्रात येथे आहेत शासकीय महाविद्यालयपशुवैद्यकीय : मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ (सातारा), उदगीर (लातूर)डेअरी टेक्नालॉजी : उदगीर व पुसद

पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सगळ्या पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांची मुलांना संधी मिळाली पाहिजे, ते अधिकारी व्हावेत, यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. - अरुण डोंगळे , अध्यक्ष, गोकुळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ