कोल्हापूर : जिल्ह्यात गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक संस्था, शाळेच्यावतीने परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.इचलकरंजी परिसरइचलकरंजी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत इचलकरंजी नगरपालिकेने आज, गुरूवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील संघटना, महाविद्यालये, हौसिंग कॉम्प्लेक्स व नागरिक यांच्यामार्फतही विविध परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे शहरातील अनेक परिसर चकचकीत दिसत होते.दरम्यान, लालबहादूूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील बीजेपी कापड मार्केट, कागवाडे मळा, तेरापंथी भवन परिसर, यशोलक्ष्मीनगर, महेश हौसिंग सोसायटी या परिसरातही राजस्थानी समाजाच्या नागरिकांनी परिसरातील स्वच्छता केली. तसेच दत्ताजीराव कदम महाविद्यालायाचे प्राचार्य मिलिंद हुजरे व दीडशे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पाच तास स्वच्छता मोहीम राबवून चार ट्रॉली कचरा जमा केला. रामभाऊ जगताप हायस्कूलच्यावतीने इचलकरंजी बसस्थानक आणि आदर्श विद्यामंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली. आक्काताई रामगोंडा कन्या महाविद्यालयाच्यावतीनेही महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. तसेच प्राचार्य डॉ. उदयसिंह माने-पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना स्वच्छतेची शपथ दिली. काही तरुणांनी आयजीएम रुग्णालय परिसर यासह शहरातील अनेक प्रमुख ठिकाणांवर सकाळी स्वच्छता मोहीम राबविली. कडगाव येथे गांधी जयंतीकडगाव : कुमार भवन, कडगाव (ता. भुदरगड) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एम. डी. किल्लेदार होते.यावेळी एस. बी. हजारे यांनी ‘महात्मा गांधी यांचे जीवनकार्य’ या विषयावर विचार व्यक्त केले. या जयंतीनिमित्त प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शालेय परिसरातील स्वच्छता केली. आंतरभारती विद्यालय : विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सी. यु. ढाले व बी. एस. गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी रोहित कुडाळकर व आदिती ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जिमखानाप्रमुख पी. पी. सातपुते यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख एम. एम. नाकाडे यांनी आभार मानले.पेठवडगाव परिसरपेठवडगाव : येथील बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शात्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. केंद्राच्यावतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ देण्यात आली. प्रतिमा पूजन प्राचार्य एस. पी. पाटील यांनी केले. यावेळी डी. बी. जाधव, एल. पी. पाटील, मनीषा पोळ उपस्थित होते. कळे परिसरकळे : कळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, कळे या प्रशाळेत आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. के. कुलकर्णी होते. यावेळी ‘स्वच्छ भारत मिशन अभियाना’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेऊन स्वत:चे मन स्वच्छ करण्याबरोबरच भौतिक स्वच्छता केल्यास संपूर्ण देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन प्राचार्य कुलकर्णी यांनी केले.कणेरी परिसरकणेरी : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा)च्यावतीने गांधी जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ यास प्रतिसाद देत कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.यावेळी सुरुवातीस उदय दुधाणे यांनी उपस्थित उद्योजकांना स्वच्छता अभियानाची प्रतिज्ञा दिली. ही मोहीम वर्षभर चालू राहणार आहे.यावेळी उद्योजक मोहन मुल्हेरकर, अजित आजरी, योगेश कुलकर्णी, देवेंद्र दिवाण, मोहन पंडितराव, लक्ष्मीदास पटेल, प्रसाद गुळवणी, श्रीकांत पोतनीस, राहुल बुधले, विश्वजित जगताप, सेक्रेटरी बी. जी. अनगोळकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.गडहिंग्लज तालुकागडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यातील विविध शाळांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. पंतप्रधान लालाबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करून अभिवादन करण्यात आले.गडहिंग्लज नगरपालिकेतर्फे साने गुरुजी वाचनालयामध्ये मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियानाची शपथ घेऊन नदीवेस येथील स्मशानभूमी, नदीघाट परिसराची स्वच्छता केली. यावेळी सर्जेराव पाटील, बाळासाहेब भैसकर, राजू भुर्इंबर, नरेंद्र कांबळे, राहिल खतीब, भैरू सलवादे, पुंडलिक सावरे, आदींसह पालिका कर्मचारी उपस्थित होते.दिनकरराव के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. पूनम रजपूत, वैजयंता बेलवाडकर, मलिकजान जलाली, शैलेश शिंदे, प्रियांका पाटील, सुप्रिया पाटील, जान्हवी नाडगौंडा, शिवानंद वंटमुरी, मनीषा सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य एस. एम. रायकर, प्रा. बी. डी. पाटील, प्रा. एस. डी. खवणेकर, आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.किलबिल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका माधुरी हत्ती यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा अंजली हत्ती यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.लोटस इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये संस्थाध्यक्ष दीपक पाटील, आप्पासाहेब कोड्ड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. विद्यार्थ्यांनी गांधी व शास्त्री यांच्या जीवनपटावर भाषणे केली. यावेळी ‘स्वच्छ भारत..स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना पाटील, प्रेमकुमार कांबळे, भाग्यश्री कुराडे, आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.बॅ. नाथ पै विद्यालयात किरण भोसले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. विष्णू बेनके, पोपट भोये, संतोष पोवार यांनी गांधीजींच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी स्वच्छतेची मोहीम राबवून वर्गखोल्या, गं्रथालय कपाट, शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी विलास जाधव, शीतल पाटील, आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.मुगळी : येथील म. गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे निजगुणी स्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आप्पासाहेब कदम, बी. जी. स्वामी, आप्पासाहेब जाधव, ईश्वर हुल्लोळी, शंकर माने, सागर आरबोळे, विजय महाडिक, गजानन कांबळे, विक्रम शिंदे, लालासाहेब शिंदे, प्रशांत महाडिक, विजय मुरकुटे, मारुती फटकोळे, रमेश महाडिक, दत्तात्रय सुतार, अनिल घोटणे, श्रीपाद स्वामी, आदींसह वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात : स्वच्छ भारत अभियानास प्रतिसाद
By admin | Published: October 02, 2014 10:53 PM