शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

परतीच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपले, शेती कामाला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:03 PM

तिसऱ्या आवर्तनात मध्यम पावसाची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला रविवारी परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. या पावसाने पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. माळरानावरील पिकांना होत असलेल्या या पावसाने बूस्ट मिळाला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. कोल्हापुरातील राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा तालुक्यासह गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रांतही पाऊस आहे.जिल्ह्याच्या बऱ्याच भागात रविवारी पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या आवर्तनातील पावसाची ही सुरुवात होती. सकाळी, दुपारी आणि रात्री ८ वाजल्यापासून पुन्हा जोरदार पावसाने झोडपले. पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. या पावसामुळे शेती कामालाही गती आली आहे. आजपासून पाच दिवस शक्य तेवढ्या शेती मशागती आणि खरीप पीक काढणी कामाचा उरक शेतकऱ्यांनी करावा असा सल्ला हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात रात्री उशिरा जोरदार हजेरीकोल्हापूर शहरात पावसाने रात्री नऊनंतर उशिरापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाण्याची तळी साचली. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.तिसऱ्या आवर्तनात मध्यम पावसाची शक्यताअति वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून वायव्य वारा, खालावणारी आर्द्रता आणि इतर काही वातावरणीय बदलामुळे पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. हा पाऊस सुरुवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबरच्या २४ तारखेपर्यंत मध्यम तीव्रतेने तर मुंबईसह कोकण, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. २६ ते २९ सप्टेंबरदरम्यानच्या तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसांत जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते असा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस