कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसवर सतेज पाटील गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 02:32 PM2018-09-14T14:32:11+5:302018-09-14T14:37:16+5:30
काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवर आमदार सतेज पाटील गटाचे वर्र्चस्व राहिले आहे. गुरुवारी दुपारी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद कांबळे, तर उपाध्यक्षपदी बयाजी शेळके आणि ऐश्वर्या भाट या विजयी झाल्या आहेत. निवडीनंतर काँग्रेस कमिटीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
कोल्हापूर : काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवर आमदार सतेज पाटील गटाचे वर्र्चस्व राहिले आहे. गुरुवारी दुपारी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद कांबळे, तर उपाध्यक्षपदी बयाजी शेळके आणि ऐश्वर्या भाट या विजयी झाल्या आहेत. निवडीनंतर काँग्रेस कमिटीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
दयानंद कांबळे
युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी १२ तारखेला ३ टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. गुरुवारी दुपारी मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यंदा जिल्हाध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. या पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये दयानंद कांबळे यांनी बाजी मारली.
दीपक थोरात
कांबळे हे गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर गावचे आहेत. उपाध्यक्ष बयाजी शेळके यांचे गाव गगनबावडा तालुक्यातील वेसरफ असून त्यांनी असळफचे सरपंच म्हणूनही याआधी काम पाहिले आहे. भाट या राधानगरी तालुक्यातील आहेत.
बयाजी शेळके
जिल्हा सरचिटणीस पदासाठी झालेल्या निवडणुकीत दिग्विजय देसाई, गणेश आडनाईक, अनिस म्हाळदार, महादेव कांबळे, नितीन बागे, नौशाद बुढेखान, विशाखा कुऱ्हाडे, विश्वजित हप्पे यांनी विजय मिळविला. कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपक थोरात यांनी पुन्हा बाजी मारली आहे. थोरात हे पीटीएमचे फुटबॉल खेळाडू असून याआधीही त्यांनी या पदावर काम केले आहे.
स्वप्निल सावंत
यावेळी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सचिन रावळ, उत्तर विधानसभा-स्वप्निल सावंत, करवीर- सचिन चौगुले, शाहूवाडी-ओंकार सुतार, कागल- मयुर डेळेकर, चंदगड- प्रदीप पाटील, राधानगरी- वैभवराज तहसीलदार, शिरोळ- फैसल पटेल हे विजयी झाले. निकालावेळी जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयास भेट दिली.