कोल्हापूर -बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये यंदा निकालातील ५.३० टक्क्यांच्या वाढीसह कोल्हापूर विभागाने ९२.४२ टक्क्यांची कमाई करीत राज्यात तृतीय स्थान मिळविले आहे.
गेल्या वर्षी विभाग पाचव्या क्रमाकांवर होता. यावर्षी विभागात ९३. ११ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. ९२. १८ टक्क्यांसह सातारा जिल्हा व्दितीय, तर ९१.६३ टक्क्यांसह सांगली जिल्हा तृतीय क्रमांकवार आहे.यावर्षी विभागातून ८१३ कनिष्ठ महाविद्यालयातून १२३८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील ११४४६९ जण उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.४२ इतकी आहे. त्यात ६८०४४ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील ६०५६९ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८९.०१ आहे. ५५८१४ मुलींनी परीक्षात दिली असून त्यापैकी ५३९०० जणी उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी ९६.५७ इतकी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ७.५६ टक्के अधिक आहे. हा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी ऑनलाईन जाहीर केला.गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ४१ जणांना शिक्षायावर्षी विभागात एकूण ४१ गैरमार्ग प्रकरणे घडली. त्यात चौकशीनंतर एका विद्यार्थ्याची या परीक्षेची संपूर्ण संपादणूक रद्द करण्यात आली. ४० विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या गैरमार्गाच्या विषयाची संपादणूक रद्द केल्याची शिक्षा करण्यात आली असल्याची माहिती आवारी यांनी दिली.