कोल्हापूर : अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०१९- २० वार्षिक क्रिडा स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पाच सुवर्ण, एक रौप्य, दोन कास्य व कबड्डी संघाने विजेतेपद पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.२२ ते २४ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. संघाला विभाग नियंत्रक रोहन पलंगे, संघव्यस्थापक कामगार अधिकारी मनिषा पवार, बाळासाहेब माने यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा निकाल असा
कुस्ती प्रकार :सुवर्ण पदक विजेते - विवेकानंद महादेव मेंडके (५७ किलो), दिपक यशवंत बेलेकर (६१ किलो), स्वप्निल नागोजी जाधव (७० किलो), भाऊसाहेब पांडुरंग पाटील (७४ किलो), प्रदीप संभाजी तांगडे (७९ किलो).रौप्य पदक : शरद अशोक जाधव (६५ किलो)कास्य पदक : मनोज बाजीराव चव्हाण (खुले गट).
कबड्डी स्पर्धा -सुवर्ण पदक : सचिन दिनकर चव्हाण (कर्णधार), सोमेश प्रकाश पोवार, सुनिल गुंडू दळवी, विक्रम रामचंद्र पाटील,अविनाश आनंदा कोळी, महेश नामदेव पाटील, बाळकृष्ण संग्राम माने, विजय परशराम गावडे, दत्तात्रय आनंदा माने.वैयक्तिक स्पर्धा २०० मी.धावणे : विनायक लक्ष्मण मुरुकटे(कास्य पदक).
नियमित असलेले काम सांभाळात सर्व खेळाडूंनी हे लख्य यश मिळले आहे. काही खेळाडूंची थोडक्यात पदक हुकले आहेत, मात्र पुन्हा ते जोमाने तयारी करून नक्कीच पुढील वर्षी यशस्वी होतील.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक