कोल्हापूर : राज्य शासनाने पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा परीक्षेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. याच्या निषेधार्थ सुरु असलेले पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरु राहीले. जिल्हाधिकारी कार्यालय, शहर पुरवठा कार्यालयासह बारा तालुक्यांच्या पुरवठा कार्यालयातील सुमारे १६८ कर्मचारी बंदमध्ये सहभागी आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या या आदेशाला स्थगिती मिळावी, असे १९ जून २०१७ व ६ सप्टेंबरला संघटनेने निवेदन दिले होते. याबाबत राज्य संघटनेची महसूल मंत्र्यांबाबत चर्चा होऊनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदनाद्वारे या आंदोलनाची कल्पना दिली होती. त्यानुसार मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
बुधवारी दुसऱ्या दिवशीही पुरवठा विभागातील कर्मचारी आपापल्या कार्यालयात जाऊन कार्यालयीन वेळेत थांबून होते. या कालावधीत त्यांनी कोणतेही कामकाज केले नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून सोमवार (दि.९)पासून महसूलचे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आंदोलनात राज्य उपाध्यक्ष विलासराव कुरणे, जिल्हाध्यक्ष सुनील देसाई, सचिन सवळेकरी, विनायक लुगडे, रसिका कोडोलीकर, गणेश बरगे, अश्विनी कारंडे, प्रसाद वडणगेकर, दत्ता पाडळकर, रसिका कोडोलीकर, विद्या पठाडे आदी सहभागी झाले होते.
पुरवठा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरु राहील्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेतील कर्मचारी असे काम बंद करुन दिवसभर कार्यालयीन वेळेत बसून होेते.