शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

कोल्हापूर : मानधनातून पोट भरत नाही, मग कसा ठेवणार फिटनेस, अंगणवाडी सेविकाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:22 AM

शासन फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणते. व्याधी जडलेल्या असताना, कुठला डॉक्टर फिट असल्याचा दाखला देणार, अशा प्रश्नांच्या जंजाळात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा वयोमर्यादा वाढीचा निर्णय अडकला आहे.

ठळक मुद्देमानधनातून पोट भरत नाही, मग कसा ठेवणार फिटनेसअंगणवाडी सेविका, मदतनीसांची व्यथा

नसीम सनदी 

कोल्हापूर : महिन्याला चार ते सात हजारांच्या मानधनात पोट भरायचे म्हटले, तरी नाकीनऊ येतात, ४0 वर्षे धावाधाव करून साठीपर्यंत कोण धड राहत नाहीत, अनेक दुखणी मागे लागतात, ही वस्तुस्थिती असताना शासन मात्र मुदतवाढ हवी, तर फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणते. व्याधी जडलेल्या असताना, कुठला डॉक्टर फिट असल्याचा दाखला देणार, अशा प्रश्नांच्या जंजाळात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा वयोमर्यादा वाढीचा निर्णय अडकला आहे. वयोमर्यादा वाढीचा लाभ द्यायचाच, तर सरळ द्या, त्याला नियम, अटी कशाला हव्यात? असा सूर या कर्मचाऱ्यांतून उमटत आहे.अंगणवाडी सेविका व मदतनिसांची वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे कायम ठेवण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने जाहीर केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वयोमर्यादा ६५ वरून ६0 करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला होता; पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

आता पूर्वीप्रमाणेच ६५ वयोमर्यादा झाल्याने सेवानिवृत्ती पाच वर्षांनी वाढल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे, तर काहींच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. आनंदापेक्षा नाराज असणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. याचे कारण शासनाने घातलेली मेडिकल सर्टिफिकेटची अट हे आहे.अंगणवाडी सेविका व मदतनिस म्हणून काम करणाऱ्या महिला या विधवा, परित्यक्ता, गोरगरीब, दारिद्ररेषेखालील कुटुंबातील असतात. त्यांना मिळणाऱ्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. मग त्यातून स्वत:चे आरोग्य चांगले राहण्याकडे त्या कधी लक्ष देणार.

सेविका व मदतनीस म्हणून काम करताना शाळाबाह्य अनेक कामे करावी लागतात. वारंवार बैठका, प्रशिक्षणे यामुळे दगदग होते. इतर स्त्रियांप्रमाणे साठीनंतर अनेक व्याधीही जडतात. ६0 वर्षांपर्यंत काम करतानाच दमायला होत आहे, आणखी वाढ झाल्याने पैसे मिळणार असले, तरी शरीर साथ देत नाही; त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्याची बऱ्याच जणींची मानसिकता आहे. निवृत्तीनंतर ७५ हजार ते १ लाख रुपये एकरकमी घेऊन औषधोपचारासह कुटुंबासाठी खर्च करावा, अशी यामागे भावना आहे.

दोनवेळा द्यावे लागणार सर्टिफिकेटशासन निर्णयानुसार ६५ वर्षांपर्यंतच्या मुदतवाढीचा लाभ घ्यायचा असल्यास, ६३ व्या आणि ६५ व्या वर्षी असे दोनवेळा आपण फिट असल्याचे सिव्हील सर्जनचे मेडिकल सर्टिफिकेट देणे बंधनकारक आहे.

शासनाने मुद्दाम मेख मारली

दतवाढीचा लाभ मिळू नये, मेडिकल सर्टिफिकेटच्या रूपाने शासनाने मुद्दाम मेख मारून ठेवली आहे. साठीनंतर दात पडणे, हाडे ठिसूळ होणे, रक्तदाबासह अनेक व्याधी जडतात. मग यात फिट नाही म्हणून मुदतवाढीचा निर्णय द्यायचा नाही हे सरकारचे धोरण चुकीचे आहे.कॉ. आप्पा पाटील, अंगणवाडी युनियन

मुदतवाढीबरोबरच सुविधाही वाढवाव्यात वयोमर्यादेतील वाढ ही आमच्यासारख्यांना फायदेशीर असली, तरी या उतार वयातील व्याधी व त्यावरील खर्च पाहता शासनाने मानधनासह अन्य सुविधाही वाढवून द्यायला हव्यात, असे केले तरच वयोवृद्ध सेविका, मदतनिसांची सेवा चांगल्याप्रकारे मिळणार आहे.

सुलोचना मंडपे, अंगणवाडी सेविका

एकूण अंगणवाडी ३९९४

  1. सेविका ३६७६
  2. मदतनीस ३६७३
  3. मिनी सेविका २७0

 

मिळणारे दरमहा मानधन

  1. सेविका : ७0३0
  2. मदतनीस : ३५00

 

 

टॅग्स :Governmentसरकारwomen and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर