शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कोल्हापूर , दीड हजारजणांवर दरोड्याचा गुन्हा,६० नावे निष्पन्न : २०० वाहनांसह ६० दुकानांची तोडफोड; हिंदुत्ववादी ५० कार्यकर्त्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:58 AM

कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ घातक हत्यारे हातात घेऊन शहरात वाहनांसह दुकानांची तोडफोड, लोकांना अडवून, लूटमार करून दंगल घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी

कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ घातक हत्यारे हातात घेऊन शहरात वाहनांसह दुकानांची तोडफोड, लोकांना अडवून, लूटमार करून दंगल घडवून आणल्याप्रकरणी पोलिसांनी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पश्चिम विभागीय अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अनिल म्हमाणे, दत्ता मिसाळ, बाजीराव नाईक, शेखर सनदी, सुभाष देसाई यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. शहरातील चारीही पोलीस ठाण्यांत एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये २०० वाहनांसह ६० दुकानांची तोडफोड झाली असून, सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी तोडफोडप्रकरणी मुकेश ऊर्फ शेखर सनदे (वय ४१, रा. सदर बाजार) व लखन माने (२८. रा. सांगवडे) यांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले, ‘कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्याकरिता रस्त्यांवर उतरलेल्या जमावाच्या उद्रेकामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतिमोर्चा काढल्याने दंगल घडली. संतप्त जमावाने गुजरी, महाद्वार रोड, बिंदू चौक, शिवाजी रोड, दसरा चौक, टाउन हॉल, सिद्धार्थनगर, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी मेन रोड, आदी परिसरांत हातांमध्ये लोखंडी गज, लाकडी दांडकी घेऊन नागरिकांच्या वाहनांसह दुकानांची तोडफोड केली. काही वाहने पेटविली. नागरिकांना धाक दाखवून त्यांची लूटमारही केली. रस्त्यांवर टायर पेटवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ‘रास्ता रोको’ आंदोलन करून जनजीवन विस्कळीत केले. कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांशी हुज्जत घालून त्यांना दुखापत केली.

या सर्व तोडफोडीच्या घटनास्थळांचा जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व राजारामपुरी पोलिसांनी पंचनामा केला. त्यामध्ये २०० वाहनांसह ६० दुकानांची तोडफोड झाली असून, सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे प्रा. शहाजी कांबळे (रा. कोल्हापूर), जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (रा. कागल), अनिल म्हमाणे (रा. उमा टॉकीज), दत्ता मिसाळ (रा. वाशी) बाजीराव नाईक (शिवाजी पेठ), शेखर सनदी (सदर बझार), सुभाष देसाई, विश्वासराव देशमुख (दोघे रा. कोल्हापूर), अविनाश शिंदे (रा. गडमुडशिंगी), सोमनाथ घोडेराव, गुणवंत नागटिळे, सुखदेव बुधिहाळकर (तिघे रा. राजेंद्रनगर), सखाराम कामत (रा. शिये, ता. करवीर), दगडू भास्कर (रा. कुडित्रे, ता. करवीर), सुशील कोल्हटकर, सुरक्षा सोहनी, वसंत लिंगनूरकर, अमित शिर्के (तिघे रा. सिद्धार्थनगर), बाळासाहेब भोसले (रा. राजारामपुरी), नीलेश बनसोडे, मोहन शेखर सनदी (दोघे, रा. विचारेमाळ), वर्षा संजय कांबळे (रा. कसबा बावडा), विकी कांबळे (सुभाष रोड), बबन सावंत (कनाननगर), जितू कांबळे (गडमुडशिंगी), श्रीमंत कांबळे, सागर कांबळे, सद्दाम रज्जाक महाराज, लखन कांबळे (सर्व. रा. गांधीनगर), सतीश माळगे (रा. उचगाव), अंकुश वराळे (रा. वळीवडे), नितीन पोवार, अक्षय चव्हाण, विनायक कुंभार, शुभम माजगावकर, सतीश माजगावकर, प्रतीक वाडेकर, युवराज गवई, सुमित ब्रह्मपुरे, यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांवर दरोडा (भादंविस कलम ३९५), बेकायदा जमाव (१४३), घातक हत्यारे घेऊन फिरणे (१४७-१४८), रस्ता अडविणे (३४१), तोडफोड (४२७), जमावबंदी आदेशाचा भंग करणे (१३५), मालमत्तेचे नुकसान करणे (१८४), आदी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले. .हिंदुत्ववादी ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा

बिंदू चौकात भीमसैनिकांच्या रस्त्यांवर लावलेल्या सुमारे पन्नास दुचाकींची हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तसेच सिद्धार्थनगर कमानीजवळ एकत्र येऊन गोंधळ घालत दगडफेक केली. त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये काही पोलिसांना दुखापत झाली. याप्रकरणी जबाबदार असलेल्या संशयित तानाजी पाटील, अमर झाड, विजय करजगार, शिवानंद स्वामी, गणेश देसाई, सुमित चौगुले, केदार भुर्के, सागर साळोखे, शरद माळी यांच्यासह ५० कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, आदी गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.शिक्षेची तरतूदपोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये संशयितांना सहज जामीन मिळणार नाही. या गुन्ह्याच्या खटल्यामध्ये दरोडा (कलम ३९५) मध्ये जन्मठेप किंवा दहा वर्षांचा सश्रम कारावास तसेच आर्थिक दंडाच्या तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते.पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज द्यावेशहरात झालेल्या दंगलीमध्ये उपद्रव करणाºया समाजकंटकांचे सीसीटीव्ही फुटेज ज्यांच्याकडे आहे, त्यांनी ते गुन्ह्याच्या तपासकामासाठी व आरोपींच्या ओळखीसाठी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावे, असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले आहे. 

कोल्हापूर शहरात झालेल्या दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादीच्या तक्रारींनुसार संशयित हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. लवकरच संशयितांना अटक केली जाईल.- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक