कोल्हापूर : एस. सी. प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रिक्त शिक्षक पदावर झालेली अवैध नेमणूक, मान्यता रद्द करण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दप्तर दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ या कार्यालयासमोर मी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे, अशी माहिती शिक्षक दगडू थडके यांनी दिली.आकुर्डे (ता. भुदरगड) येथील एस. आर. भांदिगरे माध्यमिक विद्यालयात एस. सी. प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या रिक्त शिक्षक पदावर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड झाली आहे. ती नेमणूक अवैध असून, याबाबत अवैधरीत्या मान्यता दिली आहे.
ही नेमणूक आणि मान्यता रद्द होण्याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून दप्तर दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ मी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे.
संबंधित अवैध नेमणुकीची मान्यता रद्द होणे आवश्यक असल्याची खात्री होऊनसुद्धा त्यास संरक्षण देण्याची धडपड माध्यमिक शिक्षण विभाग करीत आहे. अवैध नेमणूक, मान्यता रद्द होऊन मला न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरू राहणार असल्याची माहिती दगडू थडके यांनी दिली.
सुनावणी मंगळवारी या प्रकरणाबाबत दि. १९ एप्रिलला मी सुनावणीसाठी उपस्थित होतो; पण सुनावणी झाली नाही. यानंतर मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती थडके यांनी दिली.