शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोल्हापूर : भत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’, पहिल्यांदाच भरघोस वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:47 PM

दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’अठरा वर्षांत पहिल्यांदाच भरघोस वाढ वर्षाला २५० कोटींचा खर्च

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अठरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तेवाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे सन्मान केला. या निर्णयाने महामंडळावर भत्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी४५ कोटींवरून २५० कोटी इतका बोजा वाढणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एकमेव सेवा देणारी गाडी म्हणजे एस.टी. बस. प्रवाशांना सुखरूपपणे पोहोचविण्याची सेवा एस.टी.चे चालक-वाहक व अन्य विभागांतील कर्मचारी अखंडपणे करतात.

घरातील सण, यात्रा बाजूला ठेवून प्रवाशांच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना मात्र पगारासह मिळणारा भत्ता अल्प प्रमाणात असल्याने, महागाईच्या काळात या कामगारांची मानसिक व आर्थिक कुचंबणा होत होती.

मात्र एस. टी. महामंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली. या पगारवाढीसोबत विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

‘भत्तेवाढ’ अशी...कामगारांना हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) १८० रुपयांवरून १ हजार २०० रुपये वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला १४ ते ५० रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट १०० रुपये इतका करण्यात आला आहे.

पूर्वी असलेला ११ व १३ रुपयांचा रात्रपाळी भत्ता आता अनुक्रमे ३५ व ४५ रुपये करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता फक्त चार रुपये आहे. तो आता ७५ रुपये इतका करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रात्रवस्ती भत्ता हा ११ रुपयांवरून ८० रुपये, तर विनिर्दिष्ट (मेट्रो सिटी) ठिकाणी असलेला १५ रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता १०० रुपये करण्यात आला आहे.

मंडळाच्या अध्यक्षांनी वेतनवाढीसह भत्त्यांमध्ये भरघोस वाढ केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. संघटनेचे प्रमुख भाई जगताप यांनी या ऐतिहासिक वाढीमध्ये प्रमुख मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिवमहाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना

कामगारांना अतिरिक्त कामांचा परिपूर्ण मोबदला मिळला पाहिजे. ही भत्तेवाढ यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र ‘देर आये, दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे या भत्तेवाढीचे आम्ही स्वागत करतो. आजच्या महागाईच्या काळातील ही भत्तेवाढ अल्प आहे.- आप्पासाहेब साळोखे,विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

पूर्वीच्या भत्त्यांमध्ये चहाचे पैसे भागविणेही शक्य नव्हते. मात्र महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या नव्या भत्तेवाढीमुळे एकवेळचे जेवण तरी मिळणार आहे. त्यामुळे हिला ‘ऐतिहासिक भत्तेवाढ’ म्हणता येईल.- दीपक घाटगे,जिल्हाध्यक्ष, एस. टी. कामगार सेना

 

 

भत्तेवाढीमुळे एस.टी. कर्मचारी ‘सुसाट’अठरा वर्षांत पहिल्यांदाच भरघोस वाढ : वर्षाला २५० कोटींचा खर्चलोकमत न्यूज नेटवर्कप्रदीप शिंदे / कोल्हापूर : दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाºयांना मिळणाºया भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अठरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भत्तेवाढ करून महामंडळाने प्रामाणिकपणे काम करणाºया कर्मचाºयांचा एक प्रकारे सन्मान केला. या निर्णयाने महामंडळावर भत्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी४५ कोटींवरून २५० कोटी इतका बोजा वाढणार आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एकमेव सेवा देणारी गाडी म्हणजे एस.टी. बस. प्रवाशांना सुखरूपपणे पोहोचविण्याची सेवा एस.टी.चे चालक-वाहक व अन्य विभागांतील कर्मचारी अखंडपणे करतात. घरातील सण, यात्रा बाजूला ठेवून प्रवाशांच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करणाºया एस.टी. कर्मचाºयांना मात्र पगारासह मिळणारा भत्ता अल्प प्रमाणात असल्याने, महागाईच्या काळात या कामगारांची मानसिक व आर्थिक कुचंबणा होत होती. मात्र एस. टी. महामंडळाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली. या पगारवाढीसोबत विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केल्याने, कर्मचाºयांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.------------------------‘भत्तेवाढ’ अशी...कामगारांना हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) १८० रुपयांवरून १ हजार २०० रुपये वाढविण्यात आला आहे. पूर्वी असलेला १४ ते ५० रुपयांपर्यंतचा धुलाई भत्ता आता सरसकट १०० रुपये इतका करण्यात आला आहे. पूर्वी असलेला ११ व १३ रुपयांचा रात्रपाळी भत्ता आता अनुक्रमे ३५ व ४५ रुपये करण्यात आला आहे. सध्या साधारण ठिकाणी रात्रवस्ती भत्ता फक्त चार रुपये आहे. तो आता ७५ रुपये इतका करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला रात्रवस्ती भत्ता हा ११ रुपयांवरून ८० रुपये, तर विनिर्दिष्ट (मेट्रो सिटी) ठिकाणी असलेला १५ रुपयांचा रात्रवस्ती भत्ता आता १०० रुपये करण्यात आला आहे.---- --------------------मंडळाच्या अध्यक्षांनी वेतनवाढीसह भत्त्यांमध्ये भरघोस वाढ केली आहे, याचे आम्ही स्वागत करतो. संघटनेचे प्रमुख भाई जगताप यांनी या ऐतिहासिक वाढीमध्ये प्रमुख मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.- संजीव चिकुर्डेकर, विभागीय सचिवमहाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना------------------------------कामगारांना अतिरिक्त कामांचा परिपूर्ण मोबदला मिळला पाहिजे. ही भत्तेवाढ यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र ‘देर आये, दुरुस्त आये’ या म्हणीप्रमाणे या भत्तेवाढीचे आम्ही स्वागत करतो. आजच्या महागाईच्या काळातील ही भत्तेवाढ अल्प आहे.- आप्पासाहेब साळोखे,विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)------------------------------------------पूर्वीच्या भत्त्यांमध्ये चहाचे पैसे भागविणेही शक्य नव्हते. मात्र महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या नव्या भत्तेवाढीमुळे एकवेळचे जेवण तरी मिळणार आहे. त्यामुळे हिला ‘ऐतिहासिक भत्तेवाढ’ म्हणता येईल.- दीपक घाटगे,जिल्हाध्यक्ष, एस. टी. कामगार सेना-------------------एस.टी.चे संग्रहित छायचित्र

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर