कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयातील वेदगंगा इमारतीच्या जिन्यावरुन तोल जावून पडल्याने रुग्ण युवतीचा दूर्देवी मृत्यू झाला. दया शिवाजी दाभाडे (वय २०, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. रक्तात साखर वाढल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी तिला दाखल केले होते. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली.अधिक माहिती अशी, रक्तात साखर वाढल्याने दया दाभाडे हिला १० फेब्रुवारी रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृत्ती अत्यावस्थ झालेने वेदगंगा इमारतीमधील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री तिला महिला सर्जिकल वॉर्डकडे नेण्यात येत होते.
जिन्यावरुन उतरताना अचानक तोल जावून ती जोरात खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दूखापत होवून रक्तस्त्राव झाला. तिला पुन्हा बेशुध्दावस्थेत अपघात विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली. युवतीच्या अचानक मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली होती.नाहक बळीसीपीआर रुग्णालयाची इमारत पाच ते सहा मजली आहे. येथील लिफट बंद असल्याने अक्षक्त रुग्णांना पायऱ्या चढून वॉर्डात दाखल व्हावे लागते. ही लिफट सुरु करण्याचे औदार्य रुग्णालय प्रशासनाने दाखविलेले नाही. त्यामुळे अनेक रुग्ण भोवळ येवून जखमी झाले आहेत. लिफटची सुविधा बंद पडल्याने युवतीचा नाहक बळी गेलेची संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.