शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

 कोल्हापूर :  खर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:55 AM

अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देखर्च कमी, वाढत्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कलतज्ज्ञांचे मत; रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी

संतोष मिठारी

 कोल्हापूर : अभियांत्रिकी, वैद्यकीय विद्याशाखांपेक्षा शिक्षणाचा कमी असलेला खर्च, रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि वाढत्या संधी यांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे हा बदल होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या कलचाचणीचा निष्कर्ष शनिवारी (दि. १२) जाहीर झाला. त्यात २१ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेशित होण्याबाबतचा कल दर्शविला आहे.‘वाणिज्य’कडील विद्यार्थ्यांचा वाढता कल का आहे, याची कारणे तज्ज्ञांकडून ‘लोकमत’ने जाणून घेतली. याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्याशाखांमधील शिक्षणाचा खर्च अधिक असतो. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेसाठी जास्त कालावधी लागतो.

या तुलनेत वाणिज्य शाखेचा पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च कमी येतो. रोजगारक्षम होण्याचा कालावधी कमी आहे. त्यासह विमा, बॅँकिंग, आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी वाढत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसते.

शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. ए. एम. गुरव म्हणाले, वाणिज्य आणि व्यवस्थापन हे सर्व क्षेत्रांना आवश्यक आहे. इमारत बांधण्यासाठी कॉस्टिंग करावे लागते. मशिनरी तयार करताना किंमत ठरविणे, उत्पादन निर्मितीनंतर तिचे विपणन करणे अशा प्रत्येक ठिकाणी वाणिज्य व्यवस्थापन लागते. ‘जीएसटी’मुळे कर नियोजन, हिशेब ठेवण्यासाठी सल्लागारांची मागणी वाढत आहे. व्यावसायिकपणे करिअर करता येत असल्याने वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. गेल्या चार वर्षांत वाणिज्य, व्यवस्थापन शाखेमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

‘वाणिज्य’कडील कलाची कारणे

  1. * पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम.
  2. * जगभरात विमा, बँकिंग, नॉन-बँकिंग फायन्सस, ई-ट्रेडमध्ये होणारी वाढ
  3. * अन्य विद्याशाखांच्या तुलनेत रोजगारक्षम होण्यासाठी लागणारा कमी कालावधी.

 

शिवाजी विद्यापीठातील गेल्या चार वर्षांतील विद्यार्थिसंख्यावर्ष        वाणिज्य शाखा            व्यवस्थापन शाखा२०१३-१४     ४०६०४                   ४५८४२०१४-१५     ३८२३३                   ४६६५२०१५-१६     ४५७६२                   ४९२३२०१६-१७    ४७३८३                    ५२५२

तुकड्या वाढविल्याकोल्हापूर शहरामधील महाविद्यालयांतील वाणिज्य इंग्रजी माध्यमाची एकूण प्रवेश क्षमता ८८० आहे. त्यासाठी गेल्या वर्षी १४२९ अर्ज दाखल झाले. जादा ५४९ जागांवरील प्रवेशासाठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयाला स्वयंअर्थसाहाय्यित तुकडी देण्यात आली.

वाणिज्य शाखेत प्रवेशित झालेले शहरातील विद्यार्थीवर्ष                   विद्यार्थी* २०१३            २२७५* २०१४            २०४८* २०१५            २८११* २०१६           १९८३* २०१७            २३२४ 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर