शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

कोल्हापूर : भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा : अभय छाजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 2:31 PM

भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राज्य व देश भकास केला आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे प्रभारी अभय छाजेड यांनी केले.

ठळक मुद्देभाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश कराअभय छाजेड यांचे आवाहन : जनसंघर्ष अभियान ताकदीने राबवा

कोल्हापूर : भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत राज्य व देश भकास केला आहे. जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करा, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे प्रभारी अभय छाजेड यांनी केले.कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनसंघर्ष अभियान व संघटनात्मक बांधणीसाठी छाजेड बुधवारी कोल्हापूर दौºयावर आले होते. काँग्रेस कमिटीत आयोजित पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील होते.छाजेड म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, समाजातील एकही घटक समाधानी नाही. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जीएसटीचा बेसीक स्लॅब १८ टक्के करावा, यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आग्रही होते. गेली साडेचार वर्षे या सरकारला ते समजले नाही; पण आता उशिरा शहाणपण सुचले आहे.

पाच राज्यांच्या निकालावरून भाजपचे जनमत ओसरू लागले असून, कॉँग्रेसचा जनाधार वाढत आहे. भाजप सरकारचे अपयश व कॉँग्रेस सरकारने १0-१५ वर्षांत केलेली कामे तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘शक्ती अ‍ॅप’ला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरातही चांगले काम झाले असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट राहुल गांधी यांच्याशी संवाद करता येणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले.

पी. एन. पाटील म्हणाले, पाच राज्यांतील निकालाने कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले असून, जनसंपर्क अभियान व शक्ती अ‍ॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच झोकून देऊन काम करा. स्वागत व प्रास्ताविक प्रदेश चिटणीस प्रकाश सातपुते यांनी केले. प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पे यांनी मनोगत व्यक्त केले.महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे यांनी आभार मानले. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. सुरेश कुराडे, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, सरलाताई पाटील, ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, सुलोचना नाईकवडे, जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, बजरंग पाटील, आदी उपस्थित होते.

राहुल गांधींच्या अभिनंदनाचा ठरावकॉँग्रेस अध्यक्ष पद स्वीकारून वर्ष झाल्याबद्दल व तीन राज्यांत कॉँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन केल्याबद्दल बुधवारच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर