कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी.एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी बोलताना कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य ही दोन पवित्र क्षेत्रे आहेत; पण याच क्षेत्रांत भ्रष्टाचार थैमान घालत आहे. ज्या क्षेत्रांमुळे देशाचे नागरिक गुणसंपन्न, शक्तिशाली, मुक्त आणि आरोग्यसंपन्न घडविण्याची जबाबदारी आहे. तीच शिक्षण व्यवस्था भ्रष्ट झाली आहे. या निषेधार्थ गांधीजयंतीनिमित्त एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षण वाचवा - देश वाचवा, भ्रष्टाचार घालवा - देश वाचवा, लाच देऊ नका - लाच घेऊ नका... अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात संजय सौदलगे, ईश्वरा गायकवाड, अनिल चव्हाण, दत्तात्रय चौगुले, संजय चोरमारे, प्रशांत जाधव, महेश सूर्यवंशी, हेमलता पाटील, अनघा कशाळकर, श्रुती इनामदार, माधवी जोंग, प्रशांत चोपडे, सागर वातकर, अनिल पाटील यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी. एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.