शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : अखेरच्या टप्प्यात ‘हापूस’ जोरात, बुधवारी बाजार समितीत १४ हजार बॉक्सची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 6:05 PM

आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल १४ हजार बॉक्स आणि ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरातही थोडीफार घसरण झाली असून, ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंबा १५० रुपये डझनापर्यंत आला आहे.

ठळक मुद्देअखेरच्या टप्प्यात ‘हापूस’ जोरातबुधवारी बाजार समितीत १४ हजार बॉक्सची आवक

कोल्हापूर : आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत तब्बल १४ हजार बॉक्स आणि ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्याने दरातही थोडीफार घसरण झाली असून, ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंबा १५० रुपये डझनापर्यंत आला आहे.यंदा ‘ओखी’ वादळाने आंब्यावर दुष्परिणाम झाले होते. त्यामुळे आवक कमी होऊन दर चढेच राहतील, असा अंदाज होता; पण हापूस आंब्यांची आवक चांगली राहिली. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याचा हंगाम असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून आवक हळूहळू कमी होत जाते; पण यंंदा मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही आवक चांगली आहे. विशेषत: कोकणातून अजूनही आंब्याची चांगली आवक होत असल्याने बाजारपेठा पिवळ्याधमक दिसत आहेत.कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी आंब्याची विक्रमी आवक झाली. ‘हापूस’, ‘पायरी’, ‘लालबाग’ आंब्यांचे बॉक्स १४ हजार, तर ४ हजार ६४० पेट्यांची आवक झाली. इतर ठिकाणांहून ‘मद्रास’ हापूसपेक्षा तिप्पट आवक सुरू आहे.

घाऊक बाजारात हापूसचा बॉक्स ५० ते १५० रुपये, तर पेटीचा दर २०० ते १२०० रुपये डझन आहे. ‘पायरी’चे दर कमी असून सरासरी १०० बॉक्स, ‘लालबाग’चा दर सरासरी ७५ रुपये बॉक्स आहे. मद्रास हापूसच्या पेटीचा दर सरासरी ४५० रुपये आहे.बाजार समितीत आंब्याची पेटी व बॉक्सच्या अक्षरश: थप्प्या लागलेल्या आहेत. आवक जास्त असली तरी उठावही त्या पटीत आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण दिसत नाही.

आंब्याचा दरदाम असा-आंबा                 पेटी/ बॉक्स                 सरासरी दरकोकण  हापूस        २६४० पेटी                ७०० रुपयेकोकण हापूस          ७४८५ बॉक्स            १५० रुपयेकोकण पायरी            ५२५ बॉक्स            १०० रुपयेमद्रास हापूस           १५०० पेटी                ४५० रुपयेमद्रास हापूस            २३५० बॉक्स          १२५ रुपयेमद्रास पायरी              ५०० पेटी             २२५ रुपयेलालबाग                २६०० बॉक्स             ७५ रुपये

 

 

टॅग्स :MangoआंबाMarket Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर