लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मोहिमेत देशातील ४७ जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या२ आॅक्टोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाºया कार्यक्रमात या जिल्ह्यांंना ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.२ आॅक्टोबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेला येत्या सोमवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत देशातील पाच राज्ये, २०३ जिल्हे आणि २.४८ लाख खेडी हागणदारीमुक्त घोषित झाली आहेत. या काळात ४ कोटी ९३ लाख वैयक्तिक शौचालये, तर २ लाख ७१ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. याच मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छता दर्पण मोहीम सुरू केली. यामध्ये पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली होती. कामगिरी, सातत्य आणि पारदर्शकता या निकषांवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार देशातील ४७ जिल्हे ९० गुण मिळवून संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि वर्धा हे पाच जिल्हे आहेत.या मोहिमेअंतर्गत दर तीन महिन्यांनी गुणांकन जाहीर केले जाणार आहे आणि प्रथम येणाºया जिल्ह्यांना स्वच्छता दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याअंतर्गत २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवर आधारीत पहिला पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत येत्या गांधी जयंतीदिनी म्हणजेच दोन आॅक्टोबरला होणार आहे.----कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले गुणकोल्हापूर जिल्ह्याला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले आहेत. तसेच शाश्वतता या घटकासाठी २५ पैकी १५ गुण मिळाले आहेत; तसेच पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण मिळाले आहेत.प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामसेवक आणि कर्मचाºयांनी मेहनत घेतली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व तज्ज्ञ, सल्लागार यांनीही विशेष परिश्रम घेतले.
‘स्वच्छता दर्पण’मध्ये कोल्हापूर देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:55 AM