शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात पहिले, जिल्ह्यात २०८२ कोटींची उद्दिष्टपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:47 PM

Agriculture Sector News- पीक कर्ज वाटपात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून २४८० कोटी उद्दिष्टापैकी तब्बल २०८२ कोटींचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देपीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात पहिले, जिल्ह्यात २०८२ कोटींची उद्दिष्टपूर्ती नाबार्डकडून ११ हजार १०७ कोटींचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा सादर

कोल्हापूर : पीक कर्ज वाटपात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून २४८० कोटी उद्दिष्टापैकी तब्बल २०८२ कोटींचे वाटप केले आहे.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची मंगळवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये नाबार्डने पीक कर्ज वाटप व २०२१-२२ साठी जिल्ह्याचा ११ हजार १०७ कोटी ६४ लाखाचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा सादर करण्यात आला.जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, समाजातील दुर्बल घटकांबाबत बँकांनी नेहमीच सकारात्मक आणि सहानुभूतीचे धोरण ठेवावे. महामंडळांनी दिलेले उद्दिष्ट मार्चपर्यंत पूर्ण करावे. बँकांच्या कर्ज वसुलीमध्येही सहकार्य करावे. शासनाच्या योजना राबवत असताना अधिकाधिक बचत गटांना सामावून घ्यावे.जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने म्हणाले, ३० सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत ११ लाख १९ हजार ४०९ खाती सुरू केली आहेत. त्याचबरोबर ८ लाख १ हजार ७२४ खात्यांना रूपेकार्ड वाटप केले आहे. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत ४ लाख ८९ हजार ९५ खाती, तर प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत १ लाख ८९ हजार ६६८ खाती सुरू करण्यात आली.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत १५ हजार ७०० लोकांना २२८.९३ कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे आदी उपस्थित होते.

  • प्राथमिकता प्राप्त सेवासाठी आराखडा
  • सप्टेंबरअखेर एकूण उद्दिष्टापैकी ५ हजार २०१ कोटी (५६ टक्के) पूर्तता
  • सप्टेंबरअखेर ३० हजार ४१४ कोटी ठेवी
  • जिल्ह्यात २३ हजार ७२३ कोटी कर्जाची शिल्लक
  • आत्मनिर्भर भारतनुसार पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना ४ हजार ७९५ खात्यांमध्ये ४.८० कोटी वाटप.
  • नाबार्डचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा
  • शेती/ शेतीपूरक क्षेत्रासाठी ५०६८.७५ कोटी
  • सूक्ष्म/ लघू /मध्यम उद्योगांसाठी ४५२२.०७ कोटी
  • इतर प्राथमिक क्षेत्रासाठी १५१६.८१ कोटी प्रस्तावित
  • शेती/शेतीपूरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पीक कर्जासाठी ३०१८.७२ कोटी
  • सिंचनासाठी ५७८.७५ कोटी
  • शेती यांत्रिकीकरणासाठी ४२४.८२ कोटी
  • पशुपालन (दुग्ध) ५४४.७३ कोटी
  • कुक्कुटपालन ३८.८३ कोटी
  • शेळी-मेंढी पालन ५७.८७ कोटी
  • गोदामे/ शीतगृहांसाठी ९०.३६ कोटी
  • भू-विकास/ जमीन सुधारणा ५८.४६ कोटी
  • शेतीमाल प्रक्रिया उद्योगांसाठी १७९.७३ कोटी प्रस्तावित
  • इतर प्राथमिक क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने गृहकर्ज ८८३.२० कोटी
  • शैक्षणिक कर्ज २६६.१० कोटी
  • महिला बचत गटांसाठी १५०.०८ कोटी विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र