शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:57 AM

कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न ...

कोल्हापूर : त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा पाया घालणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा रविवारी जिल्हा परिषदेच्या दारात पुतळा स्थानापन्न झाला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पंचायत राज रचनेतील सर्वोच्च स्थानावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारात पुतळा बसवणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा ठरला आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधानपद, संरक्षण मंत्रीपद भूषवलेले यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला आणि देशाला पंचायत राजव्यवस्था दिली. देशातील इतर राज्यांनी द्विस्तरीय रचना स्वीकारली; पण महाराष्ट्राने मात्र जाणीवपूर्वक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशी उतरंड असणारी त्रिस्तरीय रचना लागू केली. स्थानिक पातळीवर नेतृत्व विकसित व्हावे, कार्यकर्त्यांची सोय व्हावी, जनतेशी सुसंवाद राहावा, या उदात्त हेतूने या पंचायत राजव्यवस्थेला बळ दिले गेले. त्याचे परिणामही चांगले दिसले. येथून अनेक जण आमदार, खासदार, मंत्री झाले. राज्य आणि देशपातळीवरील नेता घडवणाऱ्या राज्यातील ३२ पैकी एकाही जिल्हा परिषदेसमोर यशवंतरावांचा पुतळा नसणे ही बाब खटकणारी होती. यातून कोल्हापुरात माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी १९८६ साली यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन केले. माजी नगराध्यक्ष एम.के. जाधव, माजी महापौर बळीराम पोवार, माजी नगराध्यक्ष के.बी. जगदाळे, मराठा बँकेचे वसंतराव मोहिते, जगन्नाथ पोवार, विजयसिंह पाटील, किसनराव कल्याणकर, संभाजीराव पाटील, जयकुमार शिंदे यांना प्रतिष्ठानच्या समितीत घेतले. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विविध उपक्रम घेणे हा प्रतिष्ठानचा उद्देश होता. कालौघात हे प्रतिष्ठान विस्मृतीत गेले. २०१८ मध्ये प्रतिष्ठानने जिल्हा परिषदेच्या आवारात यशवंतरावांचा पुतळा बसवण्यात येईल का याबाबत चाचपणी सुरू केली. प्रतिष्ठानच्या खात्यावर १९८६ मध्ये २५ हजार रुपये ठेवले होते. व्याजासह ती रक्कम २०१८ मध्ये ४ लाख ५० इतकी झाली. एवढ्या रकमेत पुतळ्याचे काम होऊ शकत नसल्याने यशवंतराव चव्हाण पुतळा समिती स्थापन करण्यात आली. कोल्हापुरातील उद्योगपती व्ही.बी. पाटील यांना कार्याध्यक्ष केले गेले. त्यांनी स्वत:चे ७ लाख लाख ५० हजार दिले. यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांची भेट घेऊन पुतळा बसवण्याबाबत चर्चा होऊन सर्वसाधारण सभेत ठरावही झाला. जिल्हा परिषदेतील ठेकेदारांनीही पुतळा बसवण्यात पुढाकार घेतला.

चबुतरा तयार झाला, सप्टेंबर २० मध्येच पुतळाही तयार झाला, १२ मार्चला अनावरण करण्याचेही निश्चित झाले; पण लॉकडाऊनमुळे सर्वच काम थांबले. आता येत्या २२ जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते राज्यातील या एकमेव पुतळ्याचे अनावरण होत आहे.

चौकट ०१

पुतळा समितीचे योगदान

पुतळा समितीत अशोक पोवार, माणिक मंडलिक, रमेश मोरे यांचा सदस्य म्हणून समावेश केला गेला. यांनी पुतळ्याची सरकारकडून परवानगी मिळवण्याची किचकट प्रक्रिया तब्बल सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर पूर्ण केली.

चौकट ०२

देशातील चौथ्या क्रमांकाचा पुतळा

दिल्लीत संसद भवन परिसर, कराडमध्ये कराड अर्बन बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे. कोल्हापुरातील हा पुतळा देशातील चौथ्या क्रमांकाचा आहे.

चौकट ०३

कोल्हापुरातच निर्मिती

पुतळा कोल्हापुरात तयार झाला आहे. बापट कॅम्प येथील कारागीर संजय तडसकर यांनी यशवंतराव चव्हाण ब्रँझमध्ये अगदी हुबेहूब साकारले आहेत. निर्मितीचे काम ६ महिने चालले होते. १२ लाख रुपये खर्च आला आहे. ९ फूट उंची आहे.

(फोटो: १००१२०२१-कोल-झेडपी)

फोटो ओळ : यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा रविवारी कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्थानापन्न झाला.