शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कोल्हापूर : ‘शिवछत्रपती’साठी राज्य सरकारकडून ‘फुटबॉल’ उपेक्षित, प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 7:16 PM

सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवत फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’ दाखविली आहे.

ठळक मुद्दे ‘शिवछत्रपती’साठी राज्य सरकारकडून ‘फुटबॉल’ उपेक्षितप्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’

सचिनभोसले

 कोल्हापूर : सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवत फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’ दाखविली आहे.राज्य शासनातर्फे दरवर्षी खो-खो, कबड्डी, हँडबॉल, आट्यापाट्या, बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कराटे, कुस्ती, अशा खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्यात खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक व संघटकांनाही पुरस्कार देऊन गौरव करते. त्यात काही खेळांमध्ये किमान दहा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले असावेत, असा निकष लावण्यात आला आहे.

या नियमांत फुटबॉल हा खेळही बसत आहे. त्यामुळे एखाद्या प्रशिक्षकाला महाराष्ट्रासारख्या राज्यातून फुटबॉलमधून एक खेळाडू घडविताना किती कष्ट घ्यावे लागतील याचा विचारच न केलेला बरा. अशाच प्रकारची कामगिरी राज्यातून अनेक फुटबॉल प्रशिक्षक करत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या नियमावलीत त्यांच्या कामगिरीची दखलच घेतली जात नाही.

आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत राज्याचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव भारताकडून खेळला. त्याला घडविण्यात मोलाचा वाटा असलेले पुण्याचे प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल हेही ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे अंगीरवाल हे वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पटकाविलेल्या संतोष ट्रॉफी विजेत्या संघातील खेळाडू आहेत.

त्याबरोबरच अनिकेत जाधवसह मोहन बागानकडून खेळणारा निखिल कदम, २३ वर्षांखालील भारतीय संघातील गोलरक्षक सुखदेव पाटील याच्यासह अनेक खेळाडू घडविले आहेत तरीही क्रीडा खाते म्हणते तुम्ही दहा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले नाहीत. मग खेळ वाढविणाऱ्या प्रशिक्षकांना सरकारकडून प्रोत्साहन तर राहू देच पण सन्मानही मिळणे कठीण आहे.

त्यामुळे १७ वर्षाखालील विश्वचषकादरम्यान मुख्यमंत्र्यांंचे ‘फुटबॉल मिशन वन’केवळ फुटबॉलचा प्रसार करण्याकरीता होते की, ‘चमकोगिरी’साठी होते, असा सवालही फुटबॉल रसिकांकडून विचारला जात आहे.

 

जगातील २०७ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. कोलकाता, गोवा या शहरानंतर कोल्हापुरातही हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यात रसिकांसह खेळाडूंची खाणही याच कोल्हापुरात आहे तरीही क्रीडा खात्याच्या क्रीडाप्रबोधिनीत सर्व खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. मात्र, फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही.

राज्यात सद्य:स्थितीत एकूण १३ क्रीडाप्रबोधिनी आहेत. त्यातील पुणे येथील बालेवाडीमध्येच फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. हीच सोय कोल्हापूर, नागपूर, मुंबई येथे मिळाली तर महाराष्ट्रातून अनेक फुटबॉलपटू देशाला मिळतील. खेळाच्या प्रसारासाठी अशीही अपेक्षा अंगीरवार यांनी बोलून दाखविली.

 

युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मला थेट पुरस्कार जाहीर होईल असे वाटत होते. मात्र, निराशाच पदरी पडली. विशेष म्हणजे मी क्रीडा प्रबोधिनीत काम करत असतानाही अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू घडविले आहेत तरीही कागदोपत्री मला हा पुरस्कार मिळू शकत नाही. या पुरस्कारासाठी अन्य कोणती कॅटगिरी लागते का?. की माझ्या पाठीमागे गॉडफादर नाही, म्हणून हा पुरस्कार मला मिळाला नाही.- जयदीप अंगीरवाल,फुटबॉल प्रशिक्षक, पुणे

 

राज्य शासनाने फुटबॉलला बळ देणाऱ्या हातांचा गौरव केला तरच हा खेळ वाढेल. त्यातून जयदीप अंगीरवाल यांच्यासारखे रत्नपारखी देशाला व राज्याला फुटबॉलमधील अनिकेत, निखिल, सुखदेवसारखे रत्न देऊ शकणार नाहीत. सन २०१८-१९ या वर्षासाठी तरी क्रीडा खात्याने थेट अंगीरवाल यांना पुरस्कार जाहीर करून ही उणीव भरून काढावी.- विकास पाटील,माजी फुटबॉलपटू 

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर