शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोल्हापूर :घरगुती वापराचा गॅस वाहनांत भरल्याप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 7:38 PM

रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १५) पकडले. यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार पेठ, राधाकृष्ण मंदिर, कैद्यांची रांग येथे केली.

ठळक मुद्देघरगुती वापराचा गॅस वाहनांत भरल्याप्रकरणी चौघांना अटकदोन रिक्षांसह १३ सिलिंडर असा ७५ हजारांचा माल जप्त

कोल्हापूर : रिक्षामध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १५) पकडले. यामध्ये दोन रिक्षाचालकांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार पेठ, राधाकृष्ण मंदिर, कैद्यांची रांग येथे केली.या प्रकरणी संशयित मालक अविनाश शंकर सणगर (वय ३५, २८००, बी वॉर्ड, मंगळवार पेठ), रिक्षाचालक अभिजित चंद्रकांत मोहिते (३३, रा. १३४३, बी वॉर्ड, दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ), सूर्यकांत मल्लाप्पा कानडे (४५, रा. प्लॉट नंबर ४२, रामानंदनगर, कोल्हापूर) व अभितज चंदर डवरी (२२, रा. निढोरी, ता. कागल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून दोन रिक्षा, १३ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, दोन इलेक्ट्रिक वजनकाटे, गॅस भरण्यासाठी लागणारी एक इलेक्ट्रिक मोटर, हायप्रेशर रेग्युलेटर असा सुमारे ७५ हजार रुपयांचा माल जप्त केला. या चौघांना आज, शुक्रवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.अटक केलेल्या सणगरवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आठजणांविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले असून, संशयित रोहन सुभाष मंडलिक (वय ३६, रा. टेंबलाईवाडी), राजेश ईश्वर जाधव (२४, रा. टेकोली, ता. शाहूवाडी) व वाजित सलीम फरास (रा. गोदावरी अपार्टमेंट, पाचगाव , ता. करवीर) या तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.पोलिसांनी सांगितले की, मंगळवार पेठ राधाकृष्ण मंदिरजवळ रोहन मंडलिक हा अविनाश सणगर यांचे गॅस सिलिंडर व अन्य साहित्यासह आढळून आला. याप्रकरणी अविनाश सणगर, रिक्षाचालक अभिजित मोहिते या दोघांना पकडले तर संशयित मंडलिक हा पसार झाला. याचवेळी रिक्षाचालक सूर्यकांत कानडे व अभितज डवरी हे दोघे मिळून आले. याप्रकरणी एकूण चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण दहा सिलिंडर व गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले.

दरम्यान, मिरजकर तिकटीजवळील हसूरकर यांच्या दवाखान्याशेजारी संशयित राजेश जाधव हा मालक वाजित फरास घरगुती गॅस भरत होता. पोलीस आल्याचे पाहून हे दोघे पसार झाले. या ठिकाणी तीन भरलेल्या सिलिंडरसह साहित्य मिळून आले. जाधव व फरास या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण भोसले, सरोजिनी चव्हाण, उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, ज्योत्स्ना भांबिष्टे, हेड कॉन्स्टेबल डी. पी. इदे, सलीम शेख, एकनाथ चौगले, बजरंग लाड, सचिन देसाई, रंगराव चव्हाण, आदींनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर