शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : मंगळवार पेठेत डेंग्यूचे चार संशयित, तीन दिवसांत शहरात आठ रुग्ण : डेंग्यू पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 1:40 PM

गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १३३३, तर तीन दिवसांत डेंग्यूचे संशयित आठ रुग्ण आहेत. सध्या मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली, सणगर गल्ली यांसह गेल्या आठवड्यात मंगेशकरनगर येथील एका कुटुंबातील डेंग्यूसंशयित पाच रुग्ण होते.

ठळक मुद्देमंगळवार पेठेत डेंग्यूचे चार संशयिततीन दिवसांत शहरात आठ रुग्ण : डेंग्यू पाठ सोडेना

कोल्हापूर : गेल्या पाच महिन्यांपासून शहरात डेंग्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १३३३, तर तीन दिवसांत डेंग्यूचे संशयित आठ रुग्ण आहेत. सध्या मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली, सणगर गल्ली यांसह गेल्या आठवड्यात मंगेशकरनगर येथील एका कुटुंबातील डेंग्यूसंशयित पाच रुग्ण होते.जूनपासून शहरात या डेंग्यू या आजाराने डोके वर काढले आणि हीच स्थिती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होती. शहरात डेंग्यूसदृश आजाराने पाचहून अधिक जणांचा बळी गेला आहे. क ोल्हापूर महापालिकेच्या रुग्णालयासह ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण आहेत.गुलाब गल्लीमध्ये एका तरुणी तसेच दोन तरुण अशा तिघांना आणि सणगर गल्लीत १५ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाली आहे, असे नागरिकांनी सांगितले. या तीन दिवसांत शहरात आठ, तर ग्रामीण भागात ११ असे एकूण १९ डेंग्यूसंशयित रुग्ण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत. यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत.

स्वाइन फ्लूचे चार संशयितकोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने गेल्या दहा महिन्यांत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह (सीपीआर) चार खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या १६ रुग्णांपैकी चार संशयित रुग्ण शनिवार (दि. ३) अखेर उपचारासाठी दाखल आहेत. 

 

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूर