प्रकाश पाटीलकोपार्डे : आज सकाळी ८ वाजल्यापासून पुन्हा पोलीस प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालिंगा पुलाच्या पूर्वेला व पश्चिमेला सुरक्षेच्या कारणावरून बॅरिकेड्स उभा करून रस्ता बंद केला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकातून प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणावरून वाहतूक बंद केल्याने दुतर्फाबाजूस वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही लोक पायी चालत जात आहेत. मुसळधार पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बालिंगा पुलाची मच्छिंद्र होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा न घेताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हा रस्ता बंद करण्यासाठी सूचना केल्या आहेत. आठ वाजण्यापूर्वी या मार्गावरून दुचाकी लहान चार चाकी वाहने ये जा करण्यास सुरू होते. पण आठ वाजल्यानंतर पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बालिंगा महादेव मंदिर येथे व साबळेवाडी फाटा येथे बॅरिकेड्स लावून बंदोबस्तात आहेत. वाहतूक बंद केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.या मार्गावरुन वाहतूक वळवली बंदोबस्तासाठी असणारे पोलीस या ठिकाणी बॅरॅकेट्स लावून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना साबळेवाडी फाटा निटवडे प्रयाग चिखली आंबेवाडी या मार्गाकडे वाहतूक वळवत आहेत. पुलाला धोका असल्याचे कारण देत हा पूल बंद केल्याची येथे लाऊड स्पीकरवर सूचना देत आहेत.रस्त्यापासून दहा फूट पाणी खाली मुसळधार पावसामुळे जरी भोगावती नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत असली तरी रस्ता बंद होण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली नसल्याने वाहतूक बंद होणार नव्हती. पण पाणी पातळीत वाढ झाली तर रस्ता बंद करण्यासाठी उपाय योजना करण्याच्या दृष्टीने बालिंगा पुलाच्या पूर्व पश्चिम बॅरॅकेट्स उभा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण अधिकाऱ्यांच्या आतताईपणामुळे गोंधळ निर्माण झाला.
कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर वाहतूक पूर्णतः बंद, दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:24 AM