सार्वजनिक गणेश विसर्जन रविवारी उत्साही वातावरणात, कोरोनाचे निर्बंध पाळण्याचे प्रयत्न करत पार पडले. सार्वजनिक मंडळांनी वाद्याविनाच टाळ्यांच्या गजरात व मोरयाचा गजर करत फुलांनी सजवलेल्या वाहनातून गणेश मूर्ती रंकाळा परिसरात आणून इराणी खणीत विसर्जन करत अखेरचा निरोप दिला.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०१
ओळ : सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळ्यात प्रथम मानाचा मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालखीतून नेताना महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०२
ओळ : प्रथम मानाच्या गणपतीची आरती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, विजय देवणे तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०३
ओळ : पालखी मिरवणुकीने मानाचा गणपती भैरवनाथ चौकात आल्यानंतर तेथे सजवलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विजय देवणे, ॲड. धनंजय पठाडे आदी मान्यवरांसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०४
ओळ : मानाच्या गणपती विसर्जनावेळी चौकातच परिसरातील मुलींनी पारंपरिक गणवेशात झिम्मा, फुगडीचा फेरा धरला.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०५
ओळ : छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहाटे आणलेली श्री शिवाजी तरुण मंडळाची २१ फुटी महागणपतीची मूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडल्यानंतर भाविकांची झालेली गर्दी.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०६
ओळ : कोरोनाचे निर्बंध असतानाही नियमावली डावलून २१ फुटी महागणपती छत्रपती शिवाजी चौकात आणल्यानंतर तेथून विसर्जनासाठी रंकाळा खणीकडे नेताना जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांना सूचना दिल्या.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०७,०८
ओळ : दरवर्षी सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या गर्दीने ओसंडून जाणाऱ्या महाद्वार रोडवर रविवारी गणेश मूर्ती आणण्यास अगर व्यवसाय सुरु ठेवण्यास प्रतिबंध केल्याने या मार्गावर दिवसभर पोलीस बंदोबस्त व शुकशुकाट होता.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन०९
ओळ : छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचा २१ फुटी महागणपती विसर्जनासाठी रंकाळा परिसरात आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१०
ओळ : विसर्जनासाठी इराणी खणीकडे जाण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची लागलेली रांग.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन११,१२,२०,२४
ओळ : रंकाळा परिसरातील इराणी खणीत सार्वजनिक गणेश मंडळांच्या ‘श्री’च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१३
ओळ : शिवाजी पेठेतील श्री तटाकडील तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत जल्लोषात विसर्जनासाठी गणेशमूर्ती आणली.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१४
ओळ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनावेळी मंडळांना वाद्यावर निर्बंध आणले तरी लहान मुलांनी पिपाणी वाजवत उत्साह वाढवला.
फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१५
ओळ : संपूर्ण शहर व परिसरातील गणेशमूर्तींचे इराणी खणीत विसर्जन होत असल्याने महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे या दिवसभर खणीवरील व्यवस्थापनावर लक्ष ठेवून होत्या.
(सर्व फोटो : आदित्य वेल्हाळ)