शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कोल्हापूर : सामाजिक स्थित्यंतरे जाणून घेण्यासाठी विद्यापीठांत संशोधन व्हावे : काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 3:01 PM

देशाची सामाजिक, राजकीय वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होईल, त्याबाबतची आवश्यक स्थित्यंतरे जाणून घेण्याबाबतची चर्चा आणि संशोधन विद्यापीठांमध्ये व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देसामाजिक स्थित्यंतरे जाणून घेण्यासाठी विद्यापीठांत संशोधन व्हावे : काकोडकर‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन

कोल्हापूर : देशाची सामाजिक, राजकीय वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होईल, त्याबाबतची आवश्यक स्थित्यंतरे जाणून घेण्याबाबतची चर्चा आणि संशोधन विद्यापीठांमध्ये व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले.महान शिवचरित्रकार प्राचार्य डॉ. बाळकृष्ण लिखित आणि शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे संचालक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘शिवाजी द ग्रेट’ या चरित्रग्रंथाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित होते.ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर म्हणाले, आजची सामाजिक परिस्थिती, लोकतंत्र, राजकीय स्थितीची कारणमीमांसा लावण्यासाठी काही संशोधन झाले असेल. मात्र, देशाची भविष्यातील सामाजिक, राजकीय, आदी क्षेत्रांची वाटचाल कशी राहील आणि प्रगतीबाबतचे योग्य आडाखे बांधणे, तर्क लावणे दिशादर्शक ठरणार आहे. त्या दृष्टीने संशोधनाला विद्यापीठांत चालना मिळावी.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, हा ग्रंथ कोल्हापूरच्या महान परंपरेचा वारसा आहे. शिवचरित्र हाच आजच्या स्थितीतील धर्मग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी या ग्रंथाचे वाचन करावे. संशोधकांनी संकुचित विचार सोडून कार्यरत राहावे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले.

शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न साकारणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांचे स्मरण जपण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये ‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे काम सुरू केले. डॉ. बाळकृष्ण यांनी साकारलेले हे शिवचरित्र डच, पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच या भाषांमधील कागदपत्रांवर आधारित आहे. त्यांनी चार खंडांतील ग्रंथाच्या माध्यमातून शिवचरित्र जागतिक पातळीवर नेले. इतिहासाकडे सामाजिक इतिहास म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रा. डॉ. राजन गवस, मेघा पानसरे, मंजूश्री पवार, रणधीर शिंदे, आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी आभार मानले.

विचार रुजविण्याची खरी गरजया कार्यक्रमात शाहू छत्रपती म्हणाले, ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ छत्रपतींबाबतचा इंग्रजी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. त्यांचे कार्य जागतिक पातळीवरील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरणारा आहे. आजकाल छत्रपतींचे नाव घेऊन सर्व गोष्टी केल्या जातात. मात्र, त्यांचे विचार रुजविण्याची खरी गरज आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर