शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : थेट महामंडळातूनच कर्ज मिळावे, युवक-युवतींची सूचना; मराठा महासंघाचे मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 5:48 PM

बँकेऐवजी थेट महामंडळातूनच कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्रांची संख्या कमी करावी, अशा विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. या महामंडळाच्या कारभाराचे वास्तव मांडणारी वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. यात कर्ज मिळविण्यात युवक-युवतींना येणाऱ्या अडचणीही मांडल्या होत्या. त्यांची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेने ‘उद्योगशील मराठा, प्रगतशील मराठा’ हे मार्गदर्शन शिबिर घेतले.

ठळक मुद्देथेट महामंडळातूनच कर्ज मिळावे, युवक-युवतींची सूचनामराठा महासंघाचे मार्गदर्शन शिबिर

कोल्हापूर : बँकेऐवजी थेट महामंडळातूनच कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्रांची संख्या कमी करावी, अशा विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. या महामंडळाच्या कारभाराचे वास्तव मांडणारी वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. यात कर्ज मिळविण्यात युवक-युवतींना येणाऱ्या अडचणीही मांडल्या होत्या. त्यांची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेने ‘उद्योगशील मराठा, प्रगतशील मराठा’ हे मार्गदर्शन शिबिर घेतले.राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक जे. बी. करीम,अग्रणी जिल्हा बँकेचे अधिकारी एस. एस. शिंदे, चार्टर्ड अकौंटंट एस. एस. पोवार, सतीश डकरे, अनिल जाधव, नितीन हरगुडे, उद्योजक उत्तम जाधव यांनी मार्गदर्शन केले. उद्योजक अनंत पाटील, विजय पाटील यांनी अनुभव कथन केले.

यानंतर उपस्थित युवक-युवतींनी बिनव्याजी कर्ज योजनेसाठी आॅनलाईन अर्ज करणे, बँकांकडून कागदपत्रांच्या पूर्तता करताना येणाºया अडचणी मांडल्या. उत्रे (ता. पन्हाळा) येथील पृथ्वीराज पाटील म्हणाले, योजनेसाठीच्या कागदपत्रांची संख्या कमी करावी. अर्ज केल्यानंतर लवकर कर्ज मिळावे.पारगाव (ता. हातकणंगले)चे मच्छिंद्र पाटील म्हणाले, इतर महामंडळांप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बँकेऐवजी स्वनिधीतून कर्जपुरवठा करावा. कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत महामंडळाने मदत करावी. शुभांगी घेवडे यांनी या महामंडळाने कर्जपुरवठा करणाºया बँकांची नावे द्यावीत.

आॅनलाईन पोर्टलमध्ये माहिती भरण्यासाठी डेस्क निर्माण करावे, आदी मागण्यांचे पत्र यावेळी मराठा महासंघाला दिले. या मेळाव्यास शिवाजीराव हिलगे, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, शरद साळुंखे, गौरव पाटील, आदी उपस्थित होते. एकनाथ जगदाळे, शिरीष जाधव यांनी स्वागत केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. अवधूत पाटील यांनी आभार मानले.

मार्गदर्शक म्हणाले

  1. * संजय शिंदे : या योजना उद्योजकता वाढीला बळ देणाºया आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी मराठा महासंघाचा उपक्रम चांगला आहे.
  2. * जे. बी. करीम : या महामंडळाची योजना भावी उद्योजकांना उपयुक्त ठरणारी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी योग्य प्रकारे अर्ज भरावा. बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता करावी.
  3. * उत्तम जाधव : यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, कष्ट, संयमाने कार्यरत राहणे आवश्यक आहे.

 

बँकांच्या प्रतिनिधींसमवेत शनिवारी बैठकअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती बँकांना देण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजता वीरशैव बँकेमध्ये बैठक होणार आहे, असे महामंडळाच्या कोल्हापुरातील समन्वयक शुभांगी जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी यावेळी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे सादर करणे आदींबाबत मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र