शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

कोल्हापूरात घरफोड्यांचे सत्र सुरुच

By admin | Published: June 01, 2017 2:45 PM

न्यु कणेरकरनगरात ११ घरफोड्या: दोन लाखांहून मुद्देमाल चोरीस

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर/कळंबा, दि. 0१ : बोंद्रेनगर परिसरातील न्यु कणेरकर नगर हनुमान मंदिर भागात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून तब्बल ११ घरफोड्या झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. या घरफोडीत सुमारे पाच तोळ्े सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषत : या भागात राहणारे नागरिक हे मुख्यत: करवीर व राधानगरी तालुक्यातील असून नोकरी, व्यवसायानिमित्त ते याठिकाणी स्थायिक झाले आहेत. गेले दोन आठवडे हे घरफोडीचे सत्र असून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे पोलिस करतात तरी काय ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.दरम्यान, न्यु कणेरकर नगरमधील हा घरफोडीचा प्रकार समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानास पाचारण करण्यात आले. श्वानाने शेजारच्या शेतवडीतून माग काढला.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु आहे. बहुतांश: येथील कुटूंब हे मूळ गांवी गेले आहेत. त्यामुळे त्यांची घरे बंद आहेत. याच हनुमान मंदिरजवळ एक ते पाच गल्ली आहेत. येथील नागेश साताप्पा कदम हे गवंडी काम करतात. ते बेळगांव जिल्हयातील मूळ गलगुंजी (ता. खानापूर) आहेत. त्यांच्या मुलीचा विवाह होता. त्यामुळे महिनाभर ते गांवी होते. बुधवारी (दि. ३१) त्यांच्या मुलीचा विवाह झाला. त्यानंतर ते कोल्हापूरात गुरुवारी घरी आले. त्यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा उचकटून तिजोरीमधील सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये असा ऐवज नेला आहे. मूळ उस्मानाबादेतील नागनाथ शांतीनाथ कांबळे त्यांचे मेंगो ज्युस सेंटरकोल्हापूरात आहे. ते कुटूंबासमवेत गावी गेले होते. त्यांच्या घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व पाच हजार रुपये असा मुद्देमाल नेला.रिक्षा व्यावसायिक नुरुला इस्माईल शेख यांच्या घरातील २५ हजार रुपयांचा कॅमेरा व मोबाईल चोरुन नेला आहे. ते कोल्हापूरातील सदरबाजारमधील असून ते रिक्षाचालक आहेत. रमजान ईदचे रोजे सुरु असल्याने ते सदरबाजार येथे घरी गेले होते. त्यांची पत्नी आजारी आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे घरी कोण नव्हते.करंजफेण (ता. राधानगरी) येथील आनंदा शामराव वागरे हे कुटूंबासमवेत राहतात. ते शासकीय कर्मचारी आहेत. ते गांवी गेले होते .त्यांच्या घरामधील तीन हजार आणि चांदीचे आरती ताट असा माल नेला. पहिल्या गल्लीतील हनुमान मंदिर येथील राजेश ज्ञानदेव भोगम हे भोगमवाडी (ता. करवीर) हे मूळ गांवी गेले होते. त्यांच्या गावी गेले होते. ते चांदी कारागीर आहे. त्यांच्या घरातील तिजोरी उचकटली. पण, चांदीची लगड व भांडी असे कोणतेही चांदीचे साहित्य नेले नाही.महे (ता. करवीर) येथील धनाजी केरबा पाटील यांच्या घरात बालवाडी आहे. चोरट्यांनी दरवाजा उचकटला. पण,त्याठिकाीण काही मिळून आले नाही. केळोशी खुर्द (ता. राधानगरी) येथील रामकृष्ण शंकर जाधव यांचे या ठिकाणी घर आहे. ते एन.एन.सी कार्यालयात कामास आहेत. ते गांवी गेले होते. त्यांच्या घरातील दीड हजार रुपयांचे ब्रेसलेट व ५०० रुपये लांबविले. उमेश कांबळे यांचे याठिकाणी मोकळे घर आहे. त्यांचा दरवाजा उचकटून तिजोरी फोडली. पण, त्यांचे कोणतेही साहित्य चोरीस गेले नाही. ते पापाची तिकटी येथील लक्ष्मी गल्लीत राहतात. कुदळवाडी (ता. राधानगरी) येथील सर्जेराव पाटील यांचा घरातच चांदीचा कारखाना आहे. त्यांच्या घराचे कुलूप उचकटले. पण, चोरट्यांना याठिकाणी काही मिळाले नाही. तेथूनच पुढे शेतवडीकडे असलेल्या अशोक नारायण लोंढे यांचे दूमजली घर आहे. दुसऱ्या मजल्यावर लोंढे राहतात. त्यांचे पहिल्या मजल्यावर कागदाचे गोडावून आहे.गोडावूनमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. पण, त्यांना काही मिळून आले नाही.युवराज आनंदा पिलावरे हे याठिकाणी भाड्याने राहतात.ते मूळ धामोड येथील आहेत.मधू निगवे यांचे हे घर आहे.पिलावरे हे चांदी व्यावसायिक आहेत.याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.

बॅग विक्रेता रडारवर...गेले तीन दिवस या भागात एक बॅग विक्रेता मंदिराजवळील असलेल्या मंडळ शेडजवळ बसायचा. त्याची वर्तणूक संशयास्पद होती,असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान,या परिसरातील कृष्णात वरुटे व प्रविण श्रीपती पाटील यांच्या सीसीटिव्ही कॅमेरेचे फुटेज पोलिसांनी गुरुवारी दूपारी घेतले. वरुटे यांच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा बॅग विक्रेता दिसून येतो. त्यादृष्टिने पोलिस तपास करीत आहे.टोळी शक्यता...कोल्हापूर शहरात व उपनगरात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडा तोडून पोलिसांना हैराण केले आहे.त्यामुळे चार हून अधिक जणांची टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.चोरीची पिशवी दुसऱ्याच्या घरात टाकली...चांदीचे साहित्य असलेली पिशवी चोरट्यांनी आनंदा वागरे यांच्या घरामध्ये टाकली होती. चोरट्यांनी ती पिशवी उघडली नव्हती. ही पिशवी बघताच वागरे कुटुब आश्चर्यचकित झाले.