शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कोल्हापूर : बांधकाम कामगारांना तीन हजार पेन्शन द्या, कृती समितीतर्फे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:10 PM

साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, घरबांधणीसाठी दहा लाख रुपये मिळावेत, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देबांधकाम कामगारांना तीन हजार पेन्शन द्या संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे उपोषण

कोल्हापूर : साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, घरबांधणीसाठी दहा लाख रुपये मिळावेत, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी कृ ती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु गेल्या तीन महिन्यांत मागण्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याच्या निषेधार्थ समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन सादर केले. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार मंत्र्यांसोबत कृती समितीची तत्काळ बैठक घ्यावी, कामगारांच्या दाखल्यासाठी सर्व ग्रामसेवकांची एकत्रित कृती समितीसोबत बैठक लावावी, मेडिक्लेम योजना पूर्ववत चालू करावी, घरबांधणीसाठी १० लाख रुपये मिळावेत, आचारसंहितेच्या काळात कामगारांची नोंदणी व नूतनीकरण चालू ठेवावे, प्रत्येक दिवाळीला बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान मिळावे, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, कामगारांना त्वरित दाखले देण्याचे आदेश द्यावेत, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे, जोतिराम मोरे, संजय सुतार, लता चव्हाण, के. पी. पाटील, संतोष गायकवाड, अभिजित केकरे, आनंदा गुरव, अमोल कुंभार, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :collectorतहसीलदारkolhapurकोल्हापूर