शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाही, सतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:34 PM

‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले.

ठळक मुद्दे ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाहीसतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तरपालकमंत्र्यांकडे कला महोत्सव घेण्यासाठीच वेळ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.कर्जमाफीसंदर्भात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढून निदर्शने केली. यावेळी ते बोलत होते. भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात आ. हाळवणकरांनी खासदार धनंजय महाडिक यांना ‘भाजपमध्ये या, मंत्री करू,’ असे निमंत्रण देत ‘गोकुळ’विरोधातील विरोधकांचा आवाज बंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. त्या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी समाचार घेतला.

‘गोकुळ’मधील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. आम्ही त्याविरोधात सहकार न्यायालयात गेलो असून, तीन महिन्यांत याचा निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करून पुरावेही सरकारला सादर केले आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर सरकारच्या माध्यमातून आ. हाळवणकरांनी या ठिकाणी प्रशासक नेमावा, असे आव्हानही आ. पाटील यांनी दिले.

पालकमंत्र्यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आत्मीयताच नाही अशी माणसे सत्तेत बसली आहेत; त्यामुळे आपल्याला संघर्षच करावा लागेल, असे आ. पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. यासाठी एखादी बैठक घ्यावी; परंतु त्यांच्याकडून असे होत नाही. गेल्या काही महिन्यात साखरेचे दर घसरले असून साखर कारखानदार अडचणीत आहेत. त्यासाठी त्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी करूनही पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका, आ. पाटील यांनी केली.

आता हाळवणकरही मंत्रिपद वाटायला लागलेयापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद वाटत होते; परंतु आता आ. हाळवणकरही पदे वाटत असून, नंतर महेश जाधवही मंत्रिपदे वाटतील. त्यामुळे भाजपमध्ये आता काही खरे नाही, अशा शब्दांत आ. सतेज पाटील यांनी आ. हाळवणकरांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील