शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
IND vs BAN: T20 मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर! २ IPL स्टार संघात, एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोल्हापूर : ‘राजर्षी शाहूं’चा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:01 PM

आपल्या छोट्याशा संस्थानांत इंग्रज राजवटीचा जाच असतानाही सामाजिक परिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाऱ्या व १९०२ साली ५० टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्दे ‘राजर्षी शाहूं’चा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातातहवा दबावगट : महात्मा फुले, सावित्रीबाईं यांचीही नावे

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : आपल्या छोट्याशा संस्थानांत इंग्रज राजवटीचा जाच असतानाही सामाजिक परिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाऱ्या व १९०२ साली ५० टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शाहूंच्या कार्याची थोरवी देशभर पोहोचावी व त्यांच्या कार्याला अधिमान्यता मिळावी, यासाठी तसा विचार पुढे आला आहे; परंतु कुणाला ‘भारतरत्न’ द्यावा, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेत असल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आहे.

देशात व राज्यातही भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पंतप्रधानांकडे राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पुढे आली आहे. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही हा सन्मान मिळावा, अशी मागणी यापूर्वीच झाली आहे.महाराष्ट्रात गेल्या वर्षी सकल मराठा समाजाचे मूक मोर्चे सुरू झाले तेव्हा ‘शाहू महाराजांना भारतरत्न’ ही त्या मोर्चातील एक प्रमुख मागणी होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत त्या विषयाला पुन्हा तोंड फोडले.

हा सर्वोच्च सन्मान देण्याची कार्यपद्धती काय असते, यासंबंधीची चौकशी ‘लोकमत’ने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली. हा सन्मान कुणाला द्यावा, यासंबंधीची मागणी व्यक्ती, संघटना, संस्था यांपैकी कोणीही केंद्र सरकारकडे करू शकते.

मागणी न करताही केंद्र सरकार स्वत:हून हा पुरस्कार देऊ शकते; परंतु त्याची निवड करण्याचे काम पंतप्रधान कार्यालयामार्फतच होते. त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीची घोषणा राष्ट्रपती कार्यालयाकडून होते व प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्तेच त्याचे वितरण होते. पद्म पुरस्कारांची निवड मात्र गृह मंत्रालयाच्या पातळीवर होते. त्यासाठी या मंत्रालयाची तज्ज्ञ समिती आहे.‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान असून, तो २ जानेवारी १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी द्यायला सुरू केला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पहिला ‘भारतरत्न’ सन्मान देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत देशातील ४५ मान्यवरांना हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला आहे. त्यांतील १३ व्यक्तींना तो मरणोत्तर देण्यात आला आहे. एका वर्षात किमान तीन व्यक्तींना तो देता येतो, असे संकेत आहेत.

यांचा झाला गौरव...आतापर्यंत या सन्मानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मदर तेरेसा, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, नेल्सन मंडेला, जेआरडी टाटा, मोरारजी देसाई, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, जयप्रकाश नारायण, भीमसेन जोशी, अमर्त्य सेन, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी, आदी मान्यवरांचा गौरव झाला आहे.

खरे म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील काम हे ‘भारतरत्न’ पुरस्काराहूनही मोठे आहे. त्यांनी घालून दिलेली अनेक सूत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केली. आरक्षणाचा प्रेरणास्रोतच राजर्षी शाहू महाराज होते. त्यांचे हे काम देशपातळीवर जावे यासाठी त्यांना व महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला जावा; कारण ही दोन्ही बहुजनांची दैवतेच आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्या.- डॉ. जयसिंगराव पवारज्येष्ठ इतिहास संशोधक 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर