शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कोल्हापूर : भावाच्या मृत्यूचं दु:ख बाजुला सारून त्याने दिली परीक्षा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 4:19 PM

रक्षा विसर्जनाच्या दिवशीच सर्वांच्या आग्रहास्तव जड अंतक:रणाने काळजावर दगड ठेऊन भावाच्या अचानक निघून जाण्याच्या आठवणी जपत, दु:ख बाजूला सारुन सुहासला रत्नागिरीत रविवारी एकट्याने परिक्षा द्यावी लागली.

ठळक मुद्देभावाच्या मृत्यूचं दु:ख बाजुला सारून त्याने दिली परीक्षा..रक्षाविसर्जन दिवशीच निलेशच्या आठवणी जपत सुहासने दिली परीक्षा

विक्रम पाटीलकरंजफेण/कोल्हापूर : रक्षा विसर्जनाच्या दिवशीच सर्वांच्या आग्रहास्तव जड अंतक:रणाने काळजावर दगड ठेऊन भावाच्या अचानक निघून जाण्याच्या आठवणी जपत, दु:ख बाजूला सारुन सुहासला रत्नागिरीत रविवारी एकट्याने परिक्षा द्यावी लागली.कुस्तीचा एक जीवघेणा डाव त्याच्यावर उलटला अनं उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा पुरता चुराडा झाला. त्याची पोलिसात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेक दिवसापासूनची इच्छा असल्यामुळे त्याने शारिरीक चाचणी परीक्षाही दिली होती त्यामध्ये त्याला समाधानकारक ९० गुणही मिळाले होते. अनं त्या पुढील लेखी परिक्षा रविवारी  दि. ७ रोजी रत्नागिरी येथे होती.

 मात्र याच दिवशी त्याची पै-पाहुण्यांच्याकडून व मित्रपरिवारांच्याकडून रक्षाविसर्जन करण्याची वेळ येऊन ठेपली अनं सर्व उपस्थितांचा कंठ पुन्हा दाटून आला, ही कथा आहे, पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथील कुस्तीदरम्यान एकचाक डावाचा बळी ठरलेल्या  बादेवाडी ता.पन्हाळा येथील दुदैवी पै. निलेश कंदुरकरची.  कुस्तीत नाव करायचंच व घरची परंपरा जिवंत ठेवायची या जिद्दीने गरिबीची किंचितही तमा न बाळगता कंदुरकरांच्या दोन्ही तरूण पोरांनी घर सोडलं अनं वारणानगरच्या कुस्ती संकुलात तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत एकत्र राहू लागले. हाताने स्वयंपाक बनवून परिस्थितीने मिळेल त्या आहारावर समाधान मानत पिळदार शरीर बनवून चटकदार निकाली कुस्ता केल्या.

या कंदुरकरांच्या सर्जा-राजाच्या जोडीने कुस्तीत नाव करण्यास सुरवात केली. परंतु बांदिवडेतील कुस्ती मैदानातील एका कुस्तीतील दुर्घटनेने या जोडीला नियतीची दृष्ट लागली. दोन्ही पैलवान भावांची जोडी यावेळी दुभंगली.

पोटचं मिळेल पण पाटचं मिळणार नाही..! या म्हणीप्रमाणे निलेशचा थोरला भाऊ सुहास याचा लहान भावावर फार लळा होता. अनेक वेळा स्वत: अर्धपोटी राहून सुहास लहानग्या भावाला खावू घालत असे, कारण त्याच्या खेळावर त्याचा मोठा विश्वास होता. त्यामुळे तो काहीतरी करून दाखवणार याचा त्याला मोठा भरोसा होता. अनेक वेळ पैशासाठी दोघा भावंडानी लोकांच्या विहिरीच्या खुदाईची कामे घेऊन पैसे आणले, परंतू घरातील गरीब आईवडीलांना कधी उणीव भासू दिली नाही.   या भावंडाचे पोलिसात भरती होऊन नाव कमावण्याचे स्वप्न आता कुठं जवळ आलं असतानाच काळाने मात्र निलेशला हिरावून घेत आपला डाव साधला. दोघांनाही शारीरिक चाचणीत ९० गुण मिळाल्यामुळे दोघांचीही लेखी परीक्षा रविवारी रत्नागिरी येथे होणार होती. परंतु निलेशला मात्र त्या परिक्षेला कायमचेच मुकावे लागले.

सहा दिवस मृत्यूशी सामना करत असलेल्या निलेशच्या उशाशी हातात हात घेत सावलीसारखा बसून राहिलेला थोरला भाऊ सुहासचा निलेशच्या अकाली मृत्यूमुळे हातातून हात निसटला. कुटूंबाबरोबर सुहासवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला, त्यातून सुहासला सावरणेही मित्र व पै-पाहुण्यांना कठीण होऊन बसले होते. परंतु भावाच्या रक्षेला हात लावण्याचे भाग्य सुहासला लाभले नाही.

रक्षा विसर्जनाच्या दिवशीच सर्वांच्या आग्रहास्तव जड अंतक:रणाने काळजावर दगड ठेऊन निलेशच्या आठवणी जपत सुहासला रत्नागिरीत रविवारी एकट्याने परिक्षा द्यावी लागली. सकाळी दहा ते अकरा या वेळेत जाऊन परीक्षेला सुहासला सामोरे जावे लागले. रक्षाविसर्जन दिवशीच होऊ घातलेल्या या दुदैवी योगामुळे नियतीच्या खेळाची कल्पना आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSportsक्रीडा