राजाराम लोंढे -कोल्हापूर -केंद्र सरकारच्या आदेशानुसार १२ टक्के साखर निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे आहे. दोन कारखान्यांचा अपवादवगळता बहुतांशी कारखान्यांनी आपल्या ठरलेल्या कोट्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाख क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल साखर जिल्ह्यातून निर्यात करायची असून सप्टेंबर २०१६ अखेर निर्यातीसाठी मुभा आहे. निर्यात करणाऱ्या कारखान्यांना पोत्यामागे सरासरी तीनशे रुपये अनुदानाचा फायदा होणार आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होतानाच साखरेचा दर १९ रुपयांपर्यंत खाली आल्याने संपूर्ण साखर कारखानदारी हादरून गेली होती. साखर कारखानदारीला सावरण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत कारखान्यांना निर्यातीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याचे आदेश दिले होेते. त्यासाठी प्रतिटनास ४५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बाजारपेठेतील साखरेत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्यानंतर साखरेने २५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना दम दिल्यानंतर पुन्हा गती वाढली आणि दरही वाढले. सध्या साखर तीस रुपयांच्या पुढे आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्यात करण्याची मुदत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात १२ टक्क्यांप्रमाणे २५ लाख क्विंटल साखरेपैकी तब्बल २० लाख क्विंटल साखर निर्यात केली आहे. राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरकेंद्र सरकारच्या आदेशानुसार १२ टक्के साखर निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पुढे आहे. दोन कारखान्यांचा अपवादवगळता बहुतांशी कारखान्यांनी आपल्या ठरलेल्या कोट्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाख क्विंटल साखरेची निर्यात केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल साखर जिल्ह्यातून निर्यात करायची असून सप्टेंबर २०१६ अखेर निर्यातीसाठी मुभा आहे. निर्यात करणाऱ्या कारखान्यांना पोत्यामागे सरासरी तीनशे रुपये अनुदानाचा फायदा होणार आहे. यंदाचा साखर हंगाम सुरू होतानाच साखरेचा दर १९ रुपयांपर्यंत खाली आल्याने संपूर्ण साखर कारखानदारी हादरून गेली होती. साखर कारखानदारीला सावरण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत कारखान्यांना निर्यातीचे आवाहन केले होते. त्यानुसार प्रत्येक कारखान्याला एकूण उत्पादित साखरेच्या १२ टक्के साखर निर्यात करण्याचे आदेश दिले होेते. त्यासाठी प्रतिटनास ४५ रुपये अनुदान देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. निर्यातीचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बाजारपेठेतील साखरेत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर प्रत्यक्षात निर्यात सुरू झाल्यानंतर साखरेने २५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यात न करणाऱ्या कारखान्यांना दम दिल्यानंतर पुन्हा गती वाढली आणि दरही वाढले. सध्या साखर तीस रुपयांच्या पुढे आहे. सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्यात करण्याची मुदत असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात १२ टक्क्यांप्रमाणे २५ लाख क्विंटल साखरेपैकी तब्बल २० लाख क्विंटल साखर निर्यात केली आहे. असा होतो निर्यातीचा फायदा५ लाख गाळप व १२.५ टक्के उतारा गृहीत धरला तरसाखर उत्पादन - ६ लाख २५ हजार पोती१२ टक्क्यांप्रमाणे निर्यात कोटा - ७५ हजार पोती४५ रुपयांप्रमाणे मिळणारे अनुदान - २ कोटी २५ लाखप्रतिपोते होणारे अनुदान - ३०० रुपये आवाहनाला प्रतिसाद देणारा जिल्हाकेंद्र व राज्य सरकारची योजना तंतोतंत पालन करणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरचा नावलौकीक आहे. ‘एफआरपी’च्या ‘८०-२० फॉर्मुल्या’चा काटेकोरपणे अवलंब करण्याचे कामही कोल्हापूरनेच केले आहे. १०० टक्क्यांप्रमाणे २१६५ कोटी ६३ लाख एफआरपी होते, त्यापैकी ७६५ कोटी एफआरपी देय आहे. ‘गुरुदत्त’, ‘वारणा’ निर्यातीत मागेगुरुदत्त व वारणा साखर कारखाने निर्यातीत एकदम मागे आहेत. ‘गुरुदत्त’ने अद्याप एकही पोते निर्यात केलेले नाही. आगामी काळात बाजारपेठेतील साखरेचे दर ३५ रुपयांच्या पुढे जातील, अशी अपेक्षा या कारखान्यांना असल्याने त्यांनी निर्यातीकडे दुर्लक्ष केले आहे. कारखानानिहाय निर्यातीची टक्केवारी अशीआजरा १००भोगावती१००शाहू८३बिद्री८३राजाराम८२नलवडे ८०शरद ८०गायकवाड ८०जवाहर ७६दालमिया ८२घोरपडे ८५डी. वाय. पाटील७०दत्त-शिरोळ ६६पंचगंगा ८०मंडलिक ६१शाहू ८३महाडिक ८१
साखर निर्यातीत ‘कोल्हापूरच भारी’
By admin | Published: March 23, 2016 12:52 AM