कोल्हापूर : अंतरर्नाद सोशल अॅड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे लेक वाचवा अभियान यशस्वी करण्यासाठी झोपडपट्टीतील नागिरकांमध्ये स्त्रीसबलीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाळंतविड्याचे वाटप करण्यात आले. रुईकर कॉलनी येथे अंरुधती महाडिक यांच्या उपस्थिती मुलींना जन्म दिलेल्या माताना बाळंत विड्यांचे वाटप करण्यात आले.फाउंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत गेल्या महिन्याभरात सर्वेक्षण करून मुलीला जन्म दिलेल्या १४१ महिला शोधून काढण्यात आल्या. त्यामधून गरीब व गरजू तसेच ज्या महिलांच्या बाळांचे वय साधारण तीन महिने आहे.
अशा पाच महिलांना बाळंतविडे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये पाच किलो साखर, दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू, दोन किलो तेल, एक किलो तूप, दोन किलो तूरडाळ, दोन किलो खोबरे, दोन किलो खारीक, बेबी आईल, साबण तसेच आईला साडी, ड्रेस, ब्लॅकेट समावेश होता.याप्रसंगी संस्थेचे सहसचिव शाम वाघ, प्रा. आर.पी. देठे, डॉ. सिंधू आवळे, प्रा. डी.सी.तुळशीकट्टी, ए.बी.शिंदे, माधुरी रुबीना,अंतरर्नाद सोशल अॅड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे रुईकर कॉलनी येथे अंरुधती महाडिक यांच्या उपस्थिती मुलीना जन्म दिलेल्या माताना बाळंत विड्यांचे वाटप करण्यात आले.