कोल्हापूर : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सतर्फे उद्या, शनिवारी सकाळी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोराणे म्हणाले, कोल्हापूरमधील प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या पुरातन वारसा स्थळांचे जतन, संवर्धन करून त्यांची भविष्यकाळातही संपन्नता टिकविणे व पुढील पिढ्यांसमोर ती सक्षमपणे मांडणे ही यामागील संकल्पना आहे.
कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग म्हणाले, हेरिटेज वॉकच्या निमित्ताने आबालवृद्धांना कोल्हापूरमधील जाणकार, माहीतगार अभ्यासकांकडून पुरातन वास्तंूची माहिती दिली जाणार आहे.छत्रपती संभाजीराजे फौंडेशनचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे म्हणाले, हेरिटेज वॉक सर्वांसाठी खुला आहे. आपल्या शहरातील पुरातन वास्तू, वारसास्थळांचे महत्त्व जाणून घ्यावे, त्यांच्या संवर्धनासाठी आपापल्या परीने निश्चितपणे प्रयत्न करावेत. आपला हा समृद्ध वारसा जतन करण्यास हातभार लावावा.याप्रसंगी उदय घोरपडे, अरुण चोपदार, प्रसन्न मोहिते, शंकरराव यमगेकर, प्रसन्न मुळे, आदी उपस्थित होते.अशी आहेत स्थळेदसरा चौक येथून सकाळी साडेसात वाजता या वॉकला सुरुवात होणार आहे. चित्रदुर्ग मठ, चिमासाहेब महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, ब्रह्मपुरी, पंचगंगा घाट, महादेव मंदिर, टाउन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर महानगरपालिका इमारत, दूध कट्टा, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप आणि जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, साठमारी, देवल क्लब, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्कूल आॅफ टेक्निकल अॅँड इंडस्ट्रिअल एज्युकेशन, आईसाहेब महाराज चौक, ट्रेझरी आॅफिस.