शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

कोल्हापूर :  ‘हाय व्होल्टेज’ फुटबॉल  सामन्यात ‘पीटीएम’ची-‘दिलबहार’वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:29 AM

अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला केलेल्या गोलची परतफेड करत पाटाकडील तालीम (पीटीएम) मंडळाने सामन्यात २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. सोमवारी झालेला सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे‘हाय व्होल्टेज’ सामन्यात ‘पीटीएम’ची-‘दिलबहार’वर मातकेएसए वरिष्ठ गट फुटबॉल सामना

कोल्हापूर : अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला केलेल्या गोलची परतफेड करत पाटाकडील तालीम (पीटीएम) मंडळाने सामन्यात २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. सोमवारी झालेला सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए वरिष्ठ गट फुटबॉल सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ यांच्यामध्ये सामना खेळविण्यात आला. ‘हाय व्होल्टेज’असा सामना होणार असल्याने फुटबॉलप्रेमींनी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच दिलबहार तालीम मंडळाने सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरुवात करत खोलवर चढाई केली.

छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए वरिष्ठ गट फुटबॉल सामन्यात ‘हाय व्होल्टेज’ सामना असल्याने फुटबॉलप्रेमींनी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती.  (छाया : नसीर अत्तार)‘पीटीएम’च्या खेळाडूंनी ‘दिलबहार’च्या खेळाडूस अवैधरित्या अडविल्याबद्दल पंचांनी दिलबहार संघास पेनल्टी बहाल केली. मात्र, दिलबहार संघाचा खेळाडू अ‍ॅम्युसला संधीचे गोलमध्ये रूपांतर करत आले नाही. मात्र, पाठोपाठ मिळालेल्या कॉर्नर पासवर दिलबहार संघाच्या सुशांत अतिग्रेने अचूक गोल करत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर दिलबहार समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून स्टेडियम दणाणून सोडले.यावेळी मात्र पीटीएम समर्थकांच्या प्रेक्षक गॅलरीत शांतता पसरली. दिलबहार संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास अधिकच वाढला. त्यांनी पुन्हा एकदा खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. सतत होणारे आक्रमण रोखण्यासाठी पीटीएम संघाकडून ओंकार पाटील, जॉन्सन, ओंकार जाधव, रूपेश सुर्वे यांनी आक्रमक पवित्रा घेत, दिलबहार संघाची बचावफळी भेदण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांनी अपयश आल्याने मध्यंतरापर्यंत सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.उत्तरार्धात पीटीएम संघ ही आघाडी कमी करण्याच्या निर्णय घेऊनच मैदानात उतरली. शॉर्टपासवर भर देत दिलबहार संघाची बचावफळी भेदण्यास लागोपाठ प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना ५१ व्या मिनिटाला रूपेश सुर्वेच्या पासवर ओंकार जाधवने उत्कृष्टरीत्या गोल नोंदवत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला.

या गोलनंतर पीटएम समर्थकांनी स्टेडियमवर जल्लोष सुरू केला. पाठोपाठ दिलबहार संघाकडून सुशांत अतिग्रे, जावेद जमादार, पवन माळी, राहुल तळेकर, अखिल पाटील यांनी खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. मात्र, समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्या.

यावेळी पीटीएम संघाने आपल्या रणनीतीमध्ये बदल करत हृषिकेश मेथे-पाटीलला मैदानात उतरविले. हृषिकेशने ७३ व्या मिनिटाला ओंकार जाधवच्या पासवर उत्कृष्टरित्या गोल करत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिल्याने ‘पीटीएम’ने सामन्यात २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला.

साईनाथ स्पोर्टस् विजयीदुपारी झालेल्या सामन्यात साईनाथ स्पोर्टस्ने संध्यामठ तरुण मंडळावर ३-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. साईनाथ संघाकडून ५ व्या मिनिटाला वीरधवल जाधव, ४० व ६५ व्या मिनिटाला मनिष सिद्धाने गोल केले. संध्यामठ संघाकडून १६ व्या मिनिटाला आशिष पाटीलने गोल केला. अशाप्रकारे सामन्यात साईनाथ स्पोर्टस्ने विजय मिळविला.

समर्थकांची शिवीगाळपीटीएम-दिलबहार यांच्यामधील सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गोलनंतर दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्याने प्रतिस्पर्धी संघास शिवीगाळ करत, फटाके उडवत होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर काही महिला व युवती उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच हा प्रकार सुरू होता. हा प्रकार रोखण्यासाठी संयोजक, पोलीस प्रशासन व ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी भावना यावेळी महिला प्रेक्षकांनी व्यक्त केली.आजचे सामने‘पीटीएम’ ब वि. ‘उत्तरेश्वर’, दुपारी २ वा.‘प्रॅक्टिस’ अ वि. ‘बालगोपाल’, दुपारी ४ वा. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर