कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर ४० वर्षांपूर्वी मराठा समाजाचे लाखोंचे मेळावे घेणाऱ्या, स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रथम मागणी करणाºया, मराठ्यांसाठी आमदारकी पणाला लावून आरक्षणासाठी पहिले बलिदान देणाºया कै. अण्णासाहेब पाटील यांचा इतिहास मराठा समाज कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
मंगळवार पेठ येथे मराठा महासंघाच्या कार्यालयात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुळीक म्हणाले, पाटील यांनी मराठा आरक्षणासह संपूर्ण हयात माथाडी कामगारांच्या स्वाभिमान व अभिमानासाठी खर्ची घालविली. माथाडी कामगारांच्या अस्तित्वासाठी त्यांनी संपूर्ण देशात पहिल्यांदाच ‘माथाडी कामगार कायदा’ लागू करवून घेतला.
कै. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष उत्तम जाधव, संघटक प्रकाश पाटील, शरद साळुंखे, युवकाध्यक्ष अवधूत पाटील, संतोष घाडगे, गौरव पाटील, अनिल पाटील, शुभम शिरहट्टी, महेश जाधव, किरण कणसे, अमोल चिकळकर यांच्यासह सकल मराठा समाज उपस्थित होता.अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वसंतराव मुळीक. शेजारी उत्तम जाधव, शशिकांत पाटील, अवधूत पाटील, संतोष घाडगे, आदी उपस्थित होते.